Ticker

6/recent/ticker-posts

बहुजन हिताय सोसायटीतर्फे ऑनलाइन समुपदेशन



अमरावती:- कोरोना महामारीच्या परिस्थितीत एक वर्षापासून आपण जगत आहोत या परिस्थितीत अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. अनेकांच्या घरी जेवणाची व्यवस्था सुद्धा नाही, तर कुठे शिक्षणाची व्यवस्था नाही सर्वांवर आर्थिक संकट आलेला आहे.

 सर्वत्र भीती व चिंतेने कुटुंब त्रासले आहे आणि अशा परिस्थितीत अनेक कुटुंब व व्यक्ती भीती व चिंतेत जीवन जगत आहेत सध्याच्या काळात विविध समस्यांना तोंड देण्याची अडचण निर्माण होत आहे. अशावेळी बहुजन हिताय सोसायटी अमरावती संस्थे तर्फे आता समाजातील अत्यंत गरजू व गरीब लोकांना किराणा वाटप त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य नोटबुक, टेक्सबुक, शैक्षणिक किट वाटप करण्यात आला आहे.

 अशा या महामारीच्या काळावर एक उपाय म्हणून बहुजन विकास सोसायटीकडून ऑनलाइन समुपदेशन ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 11.00 पासून दुपारी 2.00 वाजता पर्यंत ऑनलाइन समुपदेशन सुरू आहे.

 गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन बहुजन हिताय सोसायटी अमरावती तर्फे करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा. 7559372945/ 7559472945

Post a Comment

0 Comments