Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत उमेदवार, पॅनल प्रमुखांनो खबरदार,, अनुचित प्रकार घडला तर..



पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत निवडणुकितील पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना आहे. उद्या मतमोजणी असून विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही सध्या जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3)चा अमल चालू आहे. त्यामुळे DJ किंवा साउंड बॉक्स लावून / बँड लावून मिरवणूक काढणे, उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत/ घरासमोर जाऊन फटाके वाजवणे, गुलाल उधळणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत. जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी त्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल.त्यासाठी सर्व उमेदवार व पॅनल प्रमुख यांना अगोदरच Crpc 149 प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत. 

        तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात  मदत करावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असतो त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती.सर्वांना उद्याच्या निकालासाठी शुभेच्छा -पांडुरंग फाडे-.पोलीस निरीक्षक- पुसद शहर पोलीस स्टेशन,पुसद

Post a Comment

0 Comments