Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता मासाहेब जिजाऊ, व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती साजरी



राजमाता जिजाऊ जन्मोत्सव 12 जानेवारी व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती पुसद नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते निखिल  चिद्दरवार यांचे राहते घरी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विधान परिषदेचे आमदार मा. निलय नाईक यांचे हस्ते मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मा जिजाऊंचा आदर्श, व स्वामी विवेकानंद यांचे महान विचार आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावे  असे मोलाचे मार्गदर्शन निलय नाईक यांनी केले.तसेच प्रमुख उपस्थित असलेले नगरसेवक, महिला कार्यकर्त्या, व,  पदाधिकारी इत्यादी सर्वांनी महापुरुषांना, विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी आमदार निलय नाईक ,भाजप नेते विनोद जिल्हेवार, नीलकंठ पाटील, नीरज पवार ,निखिल चिद्दरवार,धनंजय अत्रे ,दीपक परिहार ,सुभाष पदमवार, देविदास डोळस ,गंगाळे साहेब, पांडुरंग उतळे, रुपाली जयस्वाल, स्वाती पदमवार, मंगला डोळस ,अनिता पाटील, अपर्णा निर्मल, शितल ऊतळे आणि प्रतीक पाटील इत्यादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Vidharbhdoot साठी राजेश ढोले यवतमाळ

Post a Comment

0 Comments