राजकिय वातावरणात वाढलेला अर्णब
राजकिय वातावरणात वाढलेल्या अर्णब मनोरंजन गोस्वामी यांचे शिक्षण फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील झाले. त्यात ऑक्सफर्ड आणि केंब्रिज विद्यापिठाचा समावेश आहे. वडिल मनोरंजन रजनीकांत गोस्वामी हे आर्मीत तर आजोबा हे सुप्रसिद्ध वकिल व काँग्रेसचे नेते होते. हा प्रवास इथेच थांबत नाही तर त्यांच्या आईचे वडिल गौरीशंकर भट्टाचार्य हे स्वातंत्र्य सैनिक, उत्तम राजकारणी व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे लिडर होते. 1998 साली अर्णब यांच्या वडिलांनी भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची निवडणूक लढली होती. अर्णब यांच्या आई सुप्रभा या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. तर मामा सिद्धार्थ भट्टाचार्य हे आसामचे भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत.
शिक्षणात हुशार असलेल्या अर्णब गोस्वामींनी आपल्या करियरची सुरूवात कोलकाता मध्ये टेलिग्राफपासून केली. त्यानंतर NDTV न्यूज चॅनलचे वरिष्ठ संपादक म्हणून त्यांनी कार्य केले. 2006 साली टाइम्स नाऊ मध्ये त्यांचा प्रवेश झाला. पण तिथे जाण्यापूर्वी NDTV ची एक स्वतंत्र नवी ओळख निर्माण केली. टाइम्स नाऊला
देशातील सर्वात जास्त टिआरपी असणारा इंग्रजी चॅनल
म्हणून ओळखल्या जाण्याचे श्रेय देखील अर्णबलाच दिल्या जाते. न्यूज हाॅर नावाच्या कार्यक्रमातून सर्वात जास्त टिआरपी गोळा होत असे. इंग्रजी भाषेच्या पलीकडे जाऊन अर्णबची नवी ओळख निर्माण झाली. त्यात प्रश्न विचारून समोरच्याला घाम फुटेल अशी वेळ आणणारी आणि कुठलही राजकारण नसणारी स्वतंत्र शैली देखील निर्माण झाली. त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात अर्णब गोस्वामीच्या नावाचा वेगळाच गाभाही निर्माण झाला. राहूल गांधी, फरवेज मुशर्रफ, इंग्लडचे माजी पंतप्रधान गाॅर्डन ब्राऊन, अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हामिद कारजई, दलाई लामा, अश्या मोठ्या व्यक्तींना प्रश्न विचारण्याचे धाडस अर्णब गोस्वामीने दाखवले. त्यामुळे अनेकदा त्याचे नाव राजकीय पक्षाशी जोडल्या गेले आणि टिकेचा वर्षाव देखील झाला.
पण अर्णबने हार न पत्करता पत्रकारितेचा हा प्रवास सुरूच ठेवला. 2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटात सलग 26 तास अँकरिंग करून लोकांपर्यंत सत्य माहिती पोहोचविणारा अर्णबच. न्यूजरूममधील सततच्या राजकीय वातावरणातून बाहेर पडत स्वतःचे नवे न्यूज चॅनल रिपब्लिक भारत सुरू केले. पण हे न्यूज चॅनल रिपब्लिकन नसून अर्णबच्या लोकांवर ओरडण्याच्या आणि डिबेट मध्ये त्यांना बोलू न देण्याच्या नव्या नियमाने बंदिस्त होऊ लागले. त्यामुळे न्यूट्रल असणारा अर्णब उजवीकडे वळल्याची टिकाही झाली. त्याच चौकटीत अर्णब आज त्याच्या नेशन वाॅन्ट्स टू नो च्या नावाखाली अर्णब वाॅन्ट्स टू नो च्या विळख्यात अडकून पडलेला आहे. पण राजकीय कुटूंबात वाढलेला आणि पत्रकारितेचा सखोल अनुभव असलेला अर्णब स्वतःहून राजकारण पेटवेल का? हा मात्र चर्चेचा विषय ठरणार आहे.
झाले होते अर्णबचे अपहरण
पोलिसांजवळ रितसर वाॅरंट असतांना पोलिस कारवाईत अडथळे निर्माण करणा-या अर्णब गोस्वामीला शेवटी पोलिसांनी अटक केली. एखाद्या पत्रकारावर सरकारकडून अन्याय होत असल्यास सर्व पत्रकार एकत्र येऊन सरकारचा निषेध करण्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतू अर्णबच्या बाबतीत मात्र तसे काही घडल्याचे दिसून आले नाही. इतर माध्यमांचे पत्रकार अर्णबच्या अटकेने मौन व्रत घेऊन आनंदी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इतर पक्षातील नेत्यांच्या तुलनेत भाजप नेत्यांनी मात्र अर्णबच्या अटकेने राजकीय वातावरण तापून सोडले आहे. परंतू इतर पत्रकारांचे अर्णबच्या अटकेवर मौन व्रत धारण करून काही न घडल्यासारखे बसण्याचे कारण यात काहीच नवीन नाही. त्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय आहे की नाही हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे.
हल्ली अपहरणाच्या अनेक घटनांबद्दल आपण वाचतो. त्यात एखाद्या मोठ्या व्यक्तीचे अपहरण झाल्यास तो चर्चेचा विषय ठरतो. एका मुलाखतीदरम्यान अर्णबने आपल्यासोबत घडलेल्या अपहरणाचा किस्सा सांगितला आहे. NDTV मध्ये कार्यरत असलेल्या 22 वर्षीय अर्णबला 1996 साली लोकसभा निवडणुकीत न्यूज कव्हर करण्याची जबाबदारी देण्यात आली. बिहारमधील अति दुर्गम भाग असलेल्या पुर्निया मतदारसंघ अशिक्षीतपणा आणि गरिबीमुळे चर्चेत होताच. परंतू राजकीय वर्तुळात हा मतदारसंघ चर्चेचा विषय होता तिथल्या बाहूबलीमुळे. बाहूबली म्हणजे आपल्यासाठी साऊतचा प्रभास पण येथील बाहूबली म्हणजे येथील तरूण खासदार पप्पू यादव. वयाची तिशीही पूर्ण न केलेल्या पप्पूची दहशत त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होती. अपक्ष उमेदवार म्हणून मागची निवडणूक जिंकलेल्या पप्पूचा यावर्षीचा विजय अवघड असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशाच तापलेल्या वातावरणात अर्णब गोस्वामी पप्पूची मुलाखत घ्यायला पुर्निया मध्ये पोहोचला. मुलाखत आटपून दिल्लीकडे निघत असतांना पप्पूच्या बाॅडीगार्डनी वाटेत अडवले. काही कळायच्या आत अर्णब व कॅमेरामॅन यांना त्यांचे अपहरण झाल्याचे समजले. फिल्मी स्टाईलने अपहरण झालेल्या अर्णबला अजूनही अपहरणाचे कारण स्पष्ट झाले नव्हते. पण अपहरणाचे कारण कळल्यावर मात्र कुणाचाही त्यावर विश्वास बसत नव्हता.
अर्णब गोस्वामीच्या मुलाखतीची पद्धत, इंग्रजी बोलण्याची शैली, एकंदरीत राहणीमान या सर्व गोष्टींनी पप्पूला भारावून सोडल होतं. त्यामुळे या गोष्टींचा वापर प्रचारासाठी करण्याची पप्पूची तयारी होती. त्यानुसार आपल्या सर्व सभांमध्ये पप्पू अर्णब गोस्वामीला घेऊन जात. जगातील सर्वात मोठे न्यूज चॅनल असलेल्या बीबीसीचा वार्ताहर म्हणून अर्णबची ओळख करून देई. त्यासोबत बीबीसीच्या नावाखाली पुर्नियातून यंदा पप्पू यादव जिंकेल असं जाहिरपणे सांगायचा. पण अर्णबसाठी मात्र लोकांना खरं काय हे सांगणे शक्य नव्हते. दोन दिवस चाललेल्या या प्रकारानंतर अर्णबला मुक्त करण्यात आले. प्रचारासाठी निवडलेल्या नव्या अर्णब मार्गामुळे पप्पू पुन्हा खासदार बनला. अनेकांवर अर्णबमुळे घाम फुटण्याच्या वेळी आल्या परंतू ही परिस्थिती मात्र न भुतो न भविष्यती असल्याचे अर्णबने आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केले.
VIDARBHADOOT
0 Comments