Ticker

6/recent/ticker-posts

एक रहस्यमय किल्ला!

 

रहस्यमय गोलकोंडा किल्ला

400 वर्षांचा इतिहास असलेला. किल्ला आपल्या रहस्यमयी गोष्टींसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतो. भारतातील अनेक राजे व बादशाहांनी आपल्या आपत्कालीन परिस्थितीत रहाण्यासाठी किंवा लपण्यासाठी किल्ले बांधले होते. हे किल्ले आजही आपल्या असण्याची साक्ष देत आहेत आणि ते देशाचा अभिमान देखील आहेत. 400 फूट उंच टेकडीवर बांधलेला गोलकोंडा किल्ला हैदराबाद येथील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. हुसेन सागर तलावापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला देशातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित तलावांपैकी एक आहे. तसेच या प्रदेशातील सर्वात संरक्षित स्मारकांपैकी एक आहे. 

हा किल्ला वास्तुकला, पुराणकथा, इतिहास आणि रहस्यमय गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचे बांधकाम 1600 च्या दशकात पूर्ण झाले असे म्हटल्या जाते. परंतू ते बांधण्याचे काम 13 व्या शतकात काकतिया राजवंशाने सुरू केले होते. या किल्ल्याच्या बांधणीस एक वेगळा इतिहास आहे. असं म्हणतात की एके दिवशी एका मेंढ्या पाळणा-या मुलाला डोंगरावर एक मूर्ती सापडली. तत्कालीन शासक काकतिया राजाला जेव्हा त्या मूर्तीबद्दल कळले, तेव्हा त्याने ते पवित्र स्थान मानुन त्याच्या आजूबाजूला एक मातीचा किल्ला बांधला, जो आज गोलकोंडा किल्ला म्हणून ओळखला जातो.

या किल्ल्याला आठ दरवाजे आणि 87 बुरुज(गढ) आहेत. फतेह दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, जो 13 फूट रुंद आणि 25 फूट लांबीचा आहे. हा दरवाजा स्टीलच्या स्पाइकसह बनविला गेला आहे जो त्याचे हत्तींपासून संरक्षण करतो. हैदराबाद व सिकंदराबाद या दोन्ही शहरांना ध्यानात घेऊन डोंगराच्या माथ्यावर बांधलेला येथील दरबार हॉल पर्यटकांना या किल्ल्याच्या भव्यतेची कल्पना देतो. इथे पोहोचण्यासाठी हजारो पायर्‍या काढाव्या लागतात. या किल्ल्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे, तो अशा प्रकारे बनविला गेला आहे की जेव्हा कोणी किल्ल्याच्या मजल्यावर टाळ्या वाजवतो त्याचा आवाज बाला हिसारच्या वेशीवरुन गडभर ऐकता येतो. या जागेला 'तालिया मंडप' किंवा आधुनिक ध्वनी गजर देखील म्हटले जाते. या किल्ल्यात एक रहस्यमय बोगदा असून तो किल्ल्याच्या सर्वात खालच्या भागातून बाहेर जातो, असे म्हटले जाते. आपत्कालीन परिस्थितीत राजघराण्यातील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा बोगदा तयार करण्यात आला होता, परंतु अद्याप याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नाही.

Post a Comment

0 Comments