Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनामुळे येऊ शकतो बहिरेपणा !

 


कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. कुठलीही लस उपलब्ध नसतांना या आजारावर मात करत अनेकजण कोरोनामुक्तही झाले आहे. मात्र, कोरोनाचे काही नवीन परिणाम होत असल्याचेही समोर येत आहे. 

ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात एक नवीन बाब समोर आली आहे. त्यानुसार कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांमध्ये कायम स्वरुपी बहिरेपणाची समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा याबाबत जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे, ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या तज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यानुसार बहिरेपण का येते याचे कारण स्पष्ट नाही परंतु स्टेरॉइड्सद्वारे योग्य उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. फ्लूसारख्या व्हायरल संसर्गानंतरही अशीच समस्या उद्भवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर कोरोनामुळे बहिरेपण आलेल्या बाधितांची संख्या कमी असल्याचेही समोर आले आहे. बीएमजे केस रिपोर्ट्स नियतकालिकेत प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनात, एका ४५ वर्षीय व्यक्तीचा उल्लेख करण्यात आला आहे. या व्यक्तीला अस्थामाचाही आजार आहे. कोरोनामुळे गंभीर आजारी झाल्यानंतर अचानक त्यांच्या श्रवण क्षमेतवर परिणाम झाला. कोरोनाआधी या व्यक्तीला श्रवणाबाबत कोणतीही समस्या नव्हती. त्यानंतर या व्यक्तीवर स्टेरॉइडच्या गोळ्या आणि काही औषधे देण्यात आली. त्यानंतर काही प्रमाणात त्यांना पुन्हा ऐकू येऊ लागले. तेव्हा कोरोनामुळे काही रूग्णांच्या श्रवण क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो, हे स्पष्ट झाले. यावर अधिक संशोधन करून ही समस्या का निर्माण होतेय याची माहिती झाल्यास योग्य उपचारही करता येतील, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यास शरीरात अँण्टीबॉडी विकसित होते. त्यामुळे दुस-यांदा संसर्ग होण्याचा धोका कमी असतो, असे म्हटले जाते. कोरोनाची दुस-यांदा बाधा झाल्यास मृत्यूचा धोका कमी असल्याचाही दावा करण्यात येत होता. मात्र, दुस-यांदा बाधा झाल्यावर प्राण गमावलेली फक्त एकच महिला असल्याचेही त्यांनी सांगितले. या ८९ वर्षीय महिलेवर कर्करोगाचेही उपचार सुरू होते. दोन महिन्याच्या कालावधीत कोरोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनपासून तीला संसर्ग झाला होता. मात्र, या दोन संसर्गाच्या दरम्यान या महिलेला दोन वेळेस कोरोनाची लागण झाली. पहिल्यांदा कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचार सुरू होते. मात्र दुस-यांदा कोरोनाची लक्षणे दिसू न लागल्याने या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments