Ticker

6/recent/ticker-posts

डाळ जनतेला परवडेल का?

Akola-

Vidarbhadoot dall

रोजच्या आहारामध्ये डाळ आणि पालेभाज्या हा एक महत्वाचा घटक आहे. आणि याच महत्वाच्या घटकांचे भाव वाढले तर सर्वसामान्य जनतेला परवडेल का? कोरोना महामारी मुळे गेली सात महिने लोकांच्या हाताला काम नाही व महासात असल्याने आरोग्याची काळजी घेताना पोषक आहार खूप महत्वाचा आहे. परंतु सध्य:स्तीती पाहता गेल्या दोन महिन्या पासून भाजीपाल्याचे भाव वाढले आहे. आणि यात भर म्हणजे आता भारतात डाळीचे दरही वाढायला सुरुवात झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना नक्कीच बसणार आहे. दिल्ली सह अनेक मोठ्या शहरांमध्ये डाळींच्या किमतीत १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. तूरडाळ ११५ तर हरभरा डाळ १०० रुपयांच्या पुढे गेली आहे.नॅशनल अग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने (नफेड) पुरवठा वाढविण्यासाठी, व्यापाऱ्यांना स्टॉक रिलीज करण्याची मागणी केली आहे. डाळींची मागणी सातत्याने वाढत असल्यामुळे सध्या डाळींचा पुरवठा कमी झाला आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी 2020-21   पर्यंत आयात कोटा द्यावा अशी मागणी केली आहे. परंतु पुरवठा स्थिती योग्य प्रमाणात असल्याचे सरकारचे मत आहे व पुढील तीन महिन्यात खरीप हंगामी पीक बाजारपेठेत येण्यास सुरुवात होईल.

     कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी भारतीय डाळी व धान्य असोसिएशनच्या (आयपीजीए) वतीने आयोजित वेबिनार मध्ये बोलतांना सांगितले होते की, खरीप हंगामातील डाळींचे ऐकून उत्पादन हे ९३ लाख टन इतके होईल, अशी अपेक्षा भारताला आहे.मागील वर्षी तूर डाळीचे उत्पादन हे ३८.३ लाख टन इतके झाले होते, हेच उत्पादन यावेळी ४० लाख टन इतके होऊ शकते. लॉकडाऊन मध्ये तूर डाळीचे भाव हे प्रति किलो 10 रुपयांनी वाढले म्हणजेच ८२ रुपये प्रति किलो. सणासुदीला डाळीची मागणी वाढली असता आणखी डाळींच्या दारात वाढ होत आहे.   एप्रिल मध्ये सरकारने ४ लाख टन तूर आयात कोटा जाहीर केला होता,जो अद्याप वाटप झालेला नाही. यापैकी २ लाख टन तूर ही मोझाम्बीकडून येणार होती.    अतिवृष्टी मुळे कर्नाटकातील तूर डाळींच्या पिकाचे नुकसान होईल व यामुळे उत्पन्नामध्ये १०% तोटा होऊ शकतो , अशी भीती व्यापारी व्यक्त करीत आहेत.

      २०२०-२०२१ साठी कडधान्याच्या आयतदारांनी तूर आयात इम्पोर्ट कोटा जाहीर करावा अशी मागणी व्यापारी वर्ग करीत आहे.

Post a Comment

0 Comments