Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्या- डॉ. संदिप चव्हाण

कोरोनाच्या संकटकाळात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर भर द्या- डॉ. संदिप चव्हाण


कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अवघे जग सज्ज झाले असताना, त्याचा वाढता वेग पाहता कुठे चुकतंय हे तपासण्यासाठी बरीच मोठी यंत्रणा कामी लागली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम आले, मास्क लावतोय, होम क्वारंटाईन सुरू आहेच. या सगळ्यासोबत अजून काही महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये सर्वात पहिली बाब ही की, कोरोनाने आपण ग्रस्त होऊ  ही भीती सर्वात आगोदर आपण आपल्या मनातून काढून टाकायला हवी. मनातील भिती दूर करुन, मानसिकरित्या सक्षम होऊन आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आज अत्यंत आवश्यक असल्याचे मत सुप्रसिद्ध होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. संदिप चव्हाण यांनी 'विदर्भदूतÓशी बोलताना व्यक्त केले.  रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी होमिओपॅथीक औषधांचा मोठा फायदा होत असून, ही पॅथी मनोरचनेवर काम करणारी असल्यामुळे, रुग्राला मानसिक रित्या सक्षम बनविण्यात मोठी प्रभावी ठरत आहे. कोरोनावर आज कोणतीही लस किंवा रामबान औषधोपचार उपलब्ध नाही;  परंतु आपली रोगप्रतिकारक शक्ती जर प्रभावी असेल तर या आजारापासून आपण आपले रक्षण नक्कीच करु शकतो, त्यामुळे त्यादृष्टीने आपण काळजी घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरातील आरोग्य विभाग आज कोरोनाला हरविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. देशातील सर्वच आरोग्य यंत्रणांनी कोरोनावर प्रभावी उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी आपली कंबर कसली आहे. परंतु त्याला पाहीजे त्या प्रमाणात यश आलेली नाही. त्यामुळे आपण कोरोनापासून स्वता:चा आणि आपल्या परिवाराचा बचाव करणेच आवश्यक आहे.  त्यासाठी सर्वांनी आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आजच्या घडीला होमिओपॅथी अत्यंत उपयोगी ठरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आप-आपल्या होमिओपॅथीक तज्ज्ञांकडून औषधोपचार घेणे आवश्यक आहे.


 जगभरात कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.  रोग प्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने कोरोनाचा धोका वाढतो. आपली रोग प्रतिकारक शक्ती आपले ब:याच रोगांपासून आपले रक्षण करते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास रोग आपल्या शरीरांवर नियंत्रण घेते. त्यामुळे आपण आजारी पडतो. त्यामुळे सर्वात प्रथम रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर दिला पाहीजे.

रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या अबालवृद्धांसह सर्वांनाच हवामानाच्या बदलाने लगेच सर्दी, पडसे, ताप या सारख्या समस्यांना सामोरा जावे लागते. आणि आज घडीला कोरोनाची लक्षण ही सुद्धा याच प्रकारची आहेत, त्यामुळे परिस्थिती गंभीर असून, मानसिकरित्या लोक खचून जाताना दिसून येत आहेत. आणि होमिओपॅथी मानसिक आणि शारीरिक इलाज करीत असते, अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. या सर्व बाबींचा विचार करुन भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेसुद्धा कोरोनाच्या पाश्र्वभूमिवर इतर सर्व औषधोपचारासोबत होमिओपॅथी अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

रोग प्रतिकारक शक्ती अनेक प्रकारांच्या जिवाणू संक्रमण,  संसर्ग संक्रमणापासून संरक्षण करते. यावरुन वरून हे सिद्ध होते की रोग प्रतिकारक शक्ती कमी झाल्यास आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यात आज भयंकर अशा कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे, हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे.  कारण कोरोना या विषाणूवर अद्याप कोणतेच औषध शोधले गेलेले नाही. कोरोना एका महामारीच्या रुपाने आपल्यासमोर उभा आहे. अशात आपल्याजवळ असलेली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा पहिला उपाय आहे. आणि या उपायातला महत्त्वाचा मुद्दा असा की, जर आपण कायम भयभीत अवस्थेत राहू तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढणार नाही. याचे कारण जेव्हा मानवाचे शरीर व मन भयग्रस्त होते तेव्हा ते कार्टिसोल, इन्ट्रल्युकिन व सायटोकिनसारखे घातक द्रव्य तयार करते. ही द्रव्ये तयार होण्यामागचे कारण असे की, ही द्रव्ये शरिराला संदेश देतील की, कुठलेतरी संकट येत आहे, तयार रहा. त्यामुळे एरव्ही विकास व दुरुस्तीमध्ये व्यस्त असलेले आपले शरीर या आपत्तीकाळासाठी सज्ज होते. मात्र मनात अत्याधिक भय असेल तर ते आपले काम ठीक करू शकत नाही. म्हणजे आपल्याकडे लढण्याची सामग्री तर आहे पण ती सामग्री आपणच आपल्या कुलुपात बंद केल्यासारखी होते आहे.

आपण आजारी पडू या भयानेच आपण अर्धमेले होत जातो. आपली ही भीतीच आपली खरी शत्रू आहे. ती दुस:या शत्रूसोबत लढण्याची शरीराची क्षमता खेचून घेते. शरीर भयग्रस्त असेल तर ते रोगप्रतिकारक शक्ती योग्यरितीने वापरू शकणार नाही. त्यामुळे करोनाची भीती मनातून काढून टाकणे हेही याठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि याकाळात जर आपण धोका होण्याच्या आगोदर म्हणजे संसर्ग होण्याच्या आगोदरच होमिओपॅथीच्या आधारे आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच याचा मोठा फायदा होतो. याचाच विचार करुन अकोला शहरातील पत्रकारांना डॉ. चव्हाण होमिओपॅथीक क्लिनीकच्या वतीने मोफत होमिओपॅथीक औषधांचे नुकतेच वाटप करण्यात आले आहे. आता लवकरच दीड हजार औषधांचे वाटप करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्वांनी होमिओपॅथीचा लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ. संदिप चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments