विधानसभा निवडणुक होऊन जवळपास सहा महिने झाले. या सहा महिन्यात आमदार महोदयांनी केलेल्या कामाचा जो लेखाजोखा मांडला त्यामधे किती सत्य आहे हे पाहणे आपल्या सर्व नागरिकांचे काम आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व जिल्ह्यामध्ये परिवर्तनाचे वारे वाहणार, पण हे कसे होणार??? परिवर्तन होणार पण ते महायुतीला अनुरूप होणार आपण म्हणाल कसे तर सात पैकी सहा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. हे एकटेच महाविकास आघाडीचे आमदार आहेत. आणि हो आपल्या मतदारसंघात लोकांना कळून चुकले की आपण भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला. देशात आणि राज्यात महायुतीचे राज्य आहे आणि फक्त आपला मतदारसंघ त्याला अपवाद आहे. (आपल्या जिल्ह्यापूर्त)
वरील बाबींचा उल्लेख करण्यास कारण की मागील अडीच वर्षात कितीतरी कोटींचा निधी उपलब्ध करून दिला तो माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांनी. ही गोष्ट जनता विसरणार नाही. आमदार खरात यांनी जो अतिक्रमणाचा मुद्दा मांडला तो नगरपालिकेचा विषय आहे. आणि यांनी जर अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न केले असे असेल तर एवढ्या अतिक्रमण धारकावर अन्याय का केला, त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या रोजीरोटीचा पर्याय उपलब्ध करून का करून दिला नाही. आणि हो 300 गाळे बांधुन झाले आणि व्यापाऱ्यांना दिले त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन सांगा. आता आश्वासन देऊ नका.
दुसरा विषय आमदार साहेबांनी MIDC साठी 500 एकर जागा शासनाला फक्त मागितली, शासनाने दिली नाही शासन जेंव्हा जागा देईल त्यावेळेस जनतेला सांगा मागणी तर सर्व सामान्य माणूसही करू शकतो.
तिसरा विषय पेनटाकळी प्रकल्पग्रस्तांना ज्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या त्या कार्यक्रमासाठी प्रोटोकॉल नुसार आपली उपस्थिती होती. बाकी काही नाही कारण आपण आमदार होऊन फक्त सहा महिने झाले हा विषय खूप आधीचा आहे फुकट श्रेय घेऊ नका. त्या प्रकल्पग्रस्तांना माजी आमदार आणि खासदार साहेबांनी प्रयत्न करून उशिरा का होईना पण न्याय दिला.
तूर्त एव्हढेच.......
आपलाच : गजानन भगत सर
नायगांव दत्तापुर
0 Comments