Ticker

6/recent/ticker-posts

बुद्ध धम्माच्या विचारांमुळे समाजात शांतता आणि सुसंवाद निर्माण होऊ शकतो - राधेश्याम चांडक



बुद्ध धम्माचे समाजातील योगदान, समता, प्रेम, करुणा आणि अहिंसा या मूल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व - पु.महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी 

बुलढाणा -क्षमसुलता, बुद्धीप्रामाण्यवादी, विचारधारा, परोपकारी, चिकित्सक दृष्टीकोन यामुळे मानवाचे कल्याण घडून आले असून बुद्ध धम्माच्या विचारांमुळे समाजात शांतता आणि सुसंवाद निर्माण होऊ शकतो. असे प्रतिपादन राधेश्याम चांडक यांनी केले. सहकार विद्या मंदिराचे परिसरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बुध्द जयंती साजरी करण्यात आली. दि.१२ मे २०२५ रोजी सकाळी ८.०० वा.पुज्यनिय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी,पुज्यनिय स्वरानंद भंतेजी श्रामनेर व मान्यवरांच्या उपस्थितीत बुध्द जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सहकार विद्या मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात या सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा बुद्ध जन्मोत्सव सोहळ्यात धार्मिक व सामाजिक विचारांचा संगम दिसून आला. याप्रसंगी सहकार विद्या मंदिर परिसरात भगवान बुद्धांच्या मूर्तीचे अत्यंत भक्तिभावाने मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुज्यनिय महाथेरो धम्मज्योतीजी भंतेजी यांनी सांगितले की बुध्द धम्माचे समाजातील योगदान,समता, प्रेम,करुणा आणि अहिंसा या मुल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, या कार्यक्रमादरम्यान पुजनिय धम्मज्योतीजी भंतेजी यांनी  बुध्द वंदना व धम्म देशना केली. 

       या कार्यक्रमसाठी सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडंट मोनिका साळवे, श्री डॉ प्रमोद निकाळजे,आयकर आयुक्त नागपूर,अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके, आणि श्री प्रमोद पाटील , डॉ भागवत भुसारी जिल्हा शल्य चिकित्सक, सुभाष मानकर डेप्यटी सि.ओ.ई . परभणी बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ.सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी च्या अध्यक्षा सौ कोमलताई झंवर आदींची उपस्थिती होती.यावेळी यशसिध्दी सैनिक सेवा संघाच्या वतीने महार रेजिमेंटच्या सैनिकांना आणि रमाईच्या लेकी ग्रुपकडून पंचशील धम्म ध्वजाला मान वंदना देण्यात आली. वंदनीय भिख्खु संघालाही सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री रमेश आराख यांनी केले. या कार्यक्रमास उपासक , उपासिका व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने होते .सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सहकार विद्या मंदिरचे प्रशासकीय अधिकारी श्री सुरेश गवारे सर त्यांच्या टिमवर्कनमे  विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments