Ticker

6/recent/ticker-posts

11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले समिती भव्य शोभायात्रा आयोजन

 


 अकोला .क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने अकोला महानगरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 11 एप्रिल 2025 शुक्रवार या रोजी सायंकाळी पाच वाजता महाराणा प्रताप बाग सिटी कोतवाली चौक ते अशोक वाटिका भव्य पायदळ शोभायात्रीचे आयोजन करण्यात आले आहे .ही शोभायात्रा गांधी रोड, प्रमिलाताई ओक हॉल ,मुख्य मार्गाने अशोक वाटिका येथे या यात्रेचा समारोप होईल. तरी या भव्य शोभायात्रेत सर्व जाती धर्माच्या सर्व संघटनांनी तसेच माझ्या सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहपरिवार सहभागी व्हावे व या यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सार्वजनिक जयंती महोत्सव समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा, सौ.मायाताई ईरतकर  . (जिल्हाध्यक्षा समता परिषद अकोला) यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments