Ticker

6/recent/ticker-posts

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बेताल वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून तीव्र निषेध – बहिरखेड फाट्यावर "चपला मारो" आंदोलन

 





 अकोला :- बार्शीटाकळी तालुक्यातील बहिरखेड फाटा येथे रविवारी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात केलेल्या बेताल आणि अवमानकारक वक्तव्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वक्तव्याचा निषेध करत सकाळी १० वाजता बहिरखेड फाट्यावर शेतकरी एल्गार समिती, बार्शी टाकळी तालुक्याच्या वतीने भव्य "चपला मारो" आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचा निषेध करत त्यांच्या वक्तव्याचे प्रातिनिधिक प्रतीक म्हणून त्यांच्या फोटोंना चपलांनी मारून रोष व्यक्त केला. शेतकऱ्यांनी हातात निषेध फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली – "कोकाटे हाय हाय", "शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही", "कर्जमाफी हक्काची, भीक नव्हे!"

कोकाटे यांच्यावर उपचाराची मागणी :

या आंदोलनादरम्यान एल्गार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सांगितले की, “कृषिमंत्री कोकाटे

Post a Comment

0 Comments