Ticker

6/recent/ticker-posts

बाळापुर तालुक्यात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश..! - पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी श्रीरंग पिंजरकर यांनी कसली कंबर




शंकर जोगी

अकोला: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पक्षा शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सोन्याचे काम जोर करत आहे.

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  विचाराला प्रेरित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग दादा पिंजरकर, यांच्या मार्गदर्शनात बाळापुर तालुकाध्यक्ष मंगेश मसने यांच्या नेतृत्वात बाळापूर तालुक्यातील विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या  युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.  नेहरू पार्क स्थित शिवसेना जिल्हा कार्यालयात प्रवेश सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर यांनी कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्त पत्र घेऊन त्यांचे स्वागत केले.    यावेळी जिल्हा सचिव सतीश गोपनारायण, तालुका प्रमुख मंगेश म्हैसने,जिल्हा संघटक रामदास हरणे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख शंकर जोगी, तालुका संघटक रमेश धुंकेकर, उपशहर प्रमुख स्वप्नील देशमुख, माजी सैनिक आधाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश इंगळे, वाडेगाव शहर प्रमुख प्रशांत घाटोड , सचिन शेवालकर, विलास मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान संजय मानकर , प्रज्वल कातखेडे, दत्ता पल्हाडे, आकाश नंदाने, गोपाल मसने, संदीप पल्हाडे, संदीप सौंदळे यासह अनेक युवकांनी पक्ष प्रवेश  केले तर आशिष गणेश नंदाने, महेश सखाराम धनोकार, योगेश अरुण घाटोळ, संदीप मधुकर चिंचोलकर, गजानन वासुदेव आसोलकार,  संतोष सुखदेव लोखंडे,  सुभाष वामन पेटकर,  आकाश अनंता मुंडोकार, हर्षल चक्रधर कातखेडे,  मानकी येथील राजकुमार जगन्नाथ जावरकार, नकाशी येथील प्रशांत धर्माजी घाटोळ, तामसी येथील सुधाकर गजानन केणेकर, भारतपूर येथील संतोष गजानन घोगरे  यांची विविध पदावर नियुक्ती करून नियुक्तीपत्र देण्यात आले. शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments