Ticker

6/recent/ticker-posts

जादुटोणा विरोधी गु्न्हा नोंदविण्यास अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिस स्टेशनची टाळटाळ...एका महिलेवर अन्याय !

 


निरपराधांना मानसिक वेदना आणि आरोपींना अभय देणारे अकोला पोलिस प्रशासन !


  अकोला जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेला योग्य वळणावर आणण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  अकोला-- अकोला जिल्ह्यात वाढती गुंडगीरी,खून प्रकरणे,हल्ले,अवैध अनैतिक धंदे,आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे प्रमाण  प्रचंड  वाढलेले आहे.पोलिस प्रशासन निरपराधांना कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेऊन त्यांना मानसिक त्रास देण्याचे प्रयत्न करीत आहे.त्यामुळे अनैतिक प्रवृत्तीचे मनोबल वाढले असून अकोला जिल्ह्यातील परिस्थिती बदलण्यासाठी पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांची बदली करून कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक येथे नियुक्त करावेत.अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व प्रधान गृहसचिवांकडे करण्यात आली आहे.

अनेक थैमानांच्या उदाहरणानंतर सौ.सोनल अग्रवाल या महिलेविरूध्द झालेल्या षडयंत्राचा जादुटोणा विरोधी कायदा २०१३ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यास अकोल्यातील सिव्हील लाईन पोलिस स्टेशनमधून नकार देण्यात आला.उलट तेथील कनिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारदार महिला आणि तिला सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना असभ्य वागणूक देऊन आम्ही शासनाचे नोकर आहोत,तुमचे नाही. अशाप्रकारे उत्तरे देऊन कर्तव्यात कसूर केलेला आहे. 

 सौ.सोनल अग्रवाल ह्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या  विचारमंथन परिवाराच्या सभासद असून बजाज अलायंझ या कंपनीच्या अकोला येथील शाखाव्यवस्थापक आहेत.दि.२९ जानेवारी रोजी त्यांच्या  टू व्हिलर गाडीच्या समोरील डिक्कीमध्ये लिंबू आणि हळद,कूंकू टाकून त्यांना घाबरवण्याचे प्रयत्न त्यांच्या कार्यालयातील मुलांनी घडवून आणले.तिसऱ्या दिवशी त्यांची गाडी भोसकून पंक्चर केली.म्हणजे कोणत्याही प्रकारे या शिस्तबध्द काम करणाऱ्या महिलेला अकोला कार्यालयातून हाकलून लावायचे अशी धमकी एकाने त्यांना अगोदरच दिलेली होती.यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख,अ.भा.अंधाश्रध्दा निर्मूलन समितीच्या  विदर्भ महिला संघटीका,संवेदनशील महिला कार्यकर्त्या डॉ.स्वप्नाताई लांडे, अग्रवाल यांचे पती  तुषारजी अग्रवाल त्यांचेसोबत होते.परंतू पोलिसांना पत्रकार आणि समाजसेवींप्रती कोणताही आदर किंवा संवेदनशीलता आढळली नाही.

      आठ दिवसांपासून सिव्हील पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्यात टाळटाळ झालेली आहे. अनेक फोन करूनही येथील ठाणेदार सुनिल किनगे सुध्दा कुणाला भेटले नाहीत.एपीआय शिंदे यांची उर्मट वागणूक, आमचं कोणी काहीच बिघडवू शकत नाही.आम्हाला कायद्यांचे सर्व ज्ञान आहे, हे दाखवून देणारी होती.शेवटी जिल्हा दक्षता अधिकारी म्हणून ज्यांना शासनाने नियुक्त केलेले असते.त्या स्थानिक गुन्हे शाखेकडे धाव घेण्यात आली.कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक व जिल्हा दक्षता अधिकारी मा.शंकरजी शेळके यांनी हा गुन्हा नोंदवून त्याचा अहवाल सादर करावा असे लेखी पत्र सिव्हील लाईन पोलिस स्टेशनला दिले आहे.

      अ.भा.अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक- अध्यक्ष  व जादु टोणा विरोधी कायद्यासाठी काम करणारे मा.शाम मानव यांनी सुध्दा सिव्हील लाईन पोलिस स्टेशनमध्ये एपीआय शिंदे यांना हा विषय समजावून सांगीतला होता.तरीही १० दिवसापासून गुन्हा नोंदविलेला नाही.त्यामुळे सौ.सोनल अग्रवाल यांचे मनोबल कमी झाले असून आरोपींना अभय देण्यासाठी पोलिसांवर कुणाचा दबाव आहे,हे या प्रकरणात शोधणे गरजेचे आहे. अकोला पोलिस अधिक्षक कोणत्याही सामाजिक लोकांना किंवा पत्रकारांना सहकार्य करीत नाहीत.हे केव्हाचेच लक्षात आल्याने त्यांना भेटण्याचे टाळण्यात आले.आरोपींना मोकाट फिरण्याची मुभा देऊन निरपराधांना त्रास देणे ही पोलिसांची भूमिका संशयास्पद असून यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन होत होत.त्यामुळेच अकोला येथे अनैतिक प्रवृत्तींचे थैमान सुरू असून निरपराध मात्र न्यायापासून वंचित आहेत.याकडे लक्ष केन्द्रीत करून येथे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक नियुक्त करावे अशी मागणी संजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments