टाकरखेडा संभू (वार्ताहर) संतोष शेंडे-शाळेतला एखादा विद्यार्थी जेव्हा मोठ्या पदावर जातो त्यावेळेस या शाळेचे व गावाचे नाव तो लौकिक करीत असतो, खऱ्या अर्थाने या गुणवंत विद्यार्थ्यांमुळे शाळेची ओळख होते, असे प्रतिपादन आमदार राजेश वानखडे यांनी केले.
टाकरखेडा संभू येथील श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी उद्घाटक म्हणून आमदार राजेश वानखडे बोलत होते ,यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार किरण सरनाईक ,माजी मंत्री वसुधाताई देशमुख ,संस्थेचे उपाध्यक्ष विशाल देशमुख तर कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा निलांबरीताई देशमुख यांची उपस्थिती होती, श्रीराम हायस्कूलची प्रतिष्ठा ही सुरुवातीपासूनच चांगली राहिली आहे, आजही या शाळेचे नाव आहे, उत्कृष्ट विद्यार्थी घडविणाऱ्या या शाळेकरीता मी सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी केले, आजच्या काळात एखादी संस्था चालवणे फार संघर्षाचे आणि कठीण झालेले आहे ,प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत त्यामध्ये शिक्षण क्षेत्र हे अव्वल आहे त्यामुळे शिक्षण संस्था चालवताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे, अशा संघर्ष करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे आपल्या सर्वांचे काम असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री वसुधाताई देशमुख यांनी यावेळी केले, श्रीराम शिक्षण संस्था संचालित श्रीराम हायस्कूलच्या वतीने स्नेह संमेलन व कृतज्ञता सोहळा निमित्त सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी देखील आपला कलाविष्कार सादर केला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र सांगोले ,आभार प्रदर्शन सविता बेलसरे ,प्रास्ताविक प्राचार्य उमेश सोलव यांनी केले.सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी कुमारी श्रेष्ठा शेबे, समृद्धी यावले या विद्यार्थिनींनी केले, यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विशाल देशमुख,प्रदीप देशमुख ,आर. के. देशमुख माजी प्राचार्य, उपसरपंच प्रदीप शेंडे, दिपक पाटील, शिवानंद पाटील, सोपान गुडधे, अनिल मडके, संजय पिंगळे, दशरथ खडसे, अतुल खांदे ,प्रशांत काळे, राजू वाघ, यांच्यासह शैलेश डहाके, सुनिल प्रांजळे , संतोष देशमुख, सुरज देशमुख,अतुल घुरडे, प्रशांत मालवे, संगीता लोहेकर, रीता धनैया, शिक्षकेत्तर कर्मचारी दीपक हंबर्डे, सूनंदा देशमुख व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments