जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होण्याचे व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग अकोला च्या वतीने आवाहन
अकोला -साप्ताहिक वर्तमानपत्रे ही ग्रामीण भागातील पत्रकारितेचा कणा आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून या स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने राज्यभरात दि. 04 जुलै रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
अकोला जिल्ह्यातही 04 जुलै रोजी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने सकाळी 11.00 वाजता ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात दैनिकांप्रमाणेच साप्ताहिकांना विशेष प्रसिध्दीच्या जाहिराती देण्यात याव्यात, सर्व दर्शनी जाहिरातीचा आकार 800 चौसेमी करण्यात यावा, अधिस्वीकृतीसाठीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कोरोनापासून बंद असलेली रेल्वे प्रवासातील सवलत पूर्ववत चालू करण्यात यावी, न्यूजप्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा, अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांकडून शासकीय नियमानूसारच जाहिरातींचे वितरण करण्यात यावे, अकोला जिल्हा परिषदेतील जाहिरात वितरण, प्रसिध्दी व देयकांतील अनियमितता, गैरभाकराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी यासह विविध मागण्या करण्यात येणार आहेत. तरी या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंग अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments