नवसारी प्रभागाच्या बैठकीत स्थानिक नागरिकांमध्ये संचारला उत्साह...
अमरावती २४ जुन २०२४ :- जनतेच्या अपेक्षेनुरूप विकास कामांची पूर्तता करतांना सर्वसमावेशक जनतेची मोलाची साथ व आशीर्वाद लाभले आहे मागील चार वर्षात अमरावतीकरांनी विकासाचे पर्व अनुभवले आहे यात शाश्वत विकासाला बळकटी देऊन नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न करण्यात आल्याने विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहचली आहे मूलभूत विकास व मानव विकासाची हीच शृंखला अबाधीत राहण्यासाठी जनतेने आपला आशीर्वाद व विश्वास यथावत कायम ठेवावा अशी हाक अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी लगावली आहे . 'लक्ष अमरावती विधान सभा च्या 'अनुषंगाने आगामी दिशा व वाटचाल ठरविण्याला घेऊन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनीं सुरु केलेल्या प्रभाग प्रभागाच्या बैठकीअंतर्गत तिसरी बैठक नवसारी प्रभागात रविवार दिनांक २३ जून २०२४ रोजी स्थानिक काळा मारोती मंदिर, टॉवर लाईन रोड, अमरावती. येथे संपन्न झाली . या बैठकीला नवसारी भागातील सौरभ कॉलनी, शाकुंतल कॉलनी, पंजाबराव देशमुख कॉलनी, राजमंगल कॉलनी, पुंडलिक बाबा नगर, श्रीमंगल कॉलनी, महात्मा फुले नगर, नवसारी गाव, हर्षाराज कॉलनी, चक्रपाणी कॉलनी, विष्णू नगर, अजिंक्य कॉलनी, पंचवटी कॉलनी, राममोहन नगर, गोपी कॉलनी, तानाजी नगर, यश कॉलनी, नंदनवन कॉलनी या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . गेल्या प्रदीर्घ काळापासून विकासापासून कोसो दूर असलेल्या अमरावती शहराला विकास पथावर आणण्यासाठी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शासनाकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे .या निधीतून रस्ते विकास , नालीचे बांधकाम , क्रीडांगणांचा विकास व चैनलिंक फेन्सिंग , तसेच शहरात हरित स्वच्छ व सुंदर अमरावतीची संकल्पना साकारण्यात आली आहे. शहराचा चेहरा मोहरा बदलत असतांना या शृंखलेत नवसारी प्रभागातही विकासाची लाट आली असून प्रभागाला नवीन चकाकी आली आहे . त्यामुळे अमरावती शहराचा विकास केवळ सुलभाताईच करू शकतात व आगामी काळात आमची त्यांनाच पूर्णपणे साथ राहणार असल्याचा निर्धार स्थानिक प्रभाग रहिवासीयांनी यावेळी व्यक्त केला . यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या कि आजपर्यंत आपण घेतलेल्या निर्णयामध्ये आपल्या सहकाऱ्यांची भक्कम साथ लाभली आहे. कुठलेही कार्य करतांना आपल्या लोकांना विश्वासात घेणे महत्वाचे आहे . आपल्याला यंदाची वर्ष २०२४ ची अमरावती विधानसभा निवडणूक लढवायची असून जनतेच्या विश्वासाच्या जोरावर आता निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे . अमरावती शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार पाहता त्याठिकाणी सुसज्य रस्ते , मुबलक पाणीपुरवठा , महापालिका शाळांचा विकास , शहरी आरोग्य केंद्र त्या ठिकाणी चांगले आरोग्याच्या सुविधा पुरविण्याचा आपला प्रयत्न आहे या कार्यात जनतेने आशीर्वाद देऊन काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन आमदार सुलभाताई खोडके यांनी केले . यावेळी मार्गदर्शन करतांना संजय खोडके म्हणाले कि ज्या लोकांनी आपल्याला निववडून दिले त्यांची कामे करणे हे आपले कर्तव्यच असते म्हणून शहरात मूलभूत सुविधांच्या पूर्ततेसह सर्वसामान्य जनता , मागासवर्गीय , अल्पसंख्यांक , व्यापारी उदयोजक अशा सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा नियोजित कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु आहे. यामध्ये आगामी काळातही निश्चितच चांगली भर पडणार असल्याचं संजय खोडके यांनी सांगितलं. दरम्यान स्थानिक प्रभागवासियांमध्ये चांगला उत्साह व जोश संचारला होता .यावेळी स्थानिक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या विकासकार्यावर प्रकाश टाकला . या बैठकीला नवसारी प्रभागातील जेष्ठ नागरिक महिला भगिनी सहकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments