Ticker

6/recent/ticker-posts

नदीपात्रात रेती लोटून पुरावा नष्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न

 


गौण खनिज कलम 2013 द्वारे  कलम आय पी सी 201,21 (1),21(5) गुन्हा दाखल करा.


अखेर महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पुरावा नष्ट करण्यासाठी नदीपात्रात रेती लोटून दिली.

चिखली - मनोज जाधव - चिखली दे राजा तहसील सरहद्दीवर अवैध रित्या रेती उतख्तन्नन सुरू असल्याने त्या ठिकाणी दे राजा तहसील व चिखली तहसील दोन्ही अधिकाऱ्यांनी पाहणी करून अखेर उतख्तन्नसंदर्भात नेमकं क्षेत्र कुणाचं या द्विधा परिस्थीतीत असल्याने रेती साठा जप्त न करू शकल्याने रातोरात रेती गायब करून त्या ठिकाणी असलेल्या उर्वरीत रेतीला नदीपात्रात लोटून पुरावा नष्ट केला असल्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला  दिसून येत आहे.

इसरूळ येथील नागरिकांनी दे राजा चिखली बॉण्डरी वर असलेल्या रामाधान वायाळ यांनी भल्या मोठ्या प्रमाणात नदीपात्रातून रेती उतख्तन्नन करून शासनाला जवळपास दोन कोटी चा चुना लावला असून त्याठिकाणी दे राजा तहसील व चिखली  तहसीलचे अधिकारी यांनी प्रत्क्षय पाहणी करून त्याठिकाणी असलेला रेती साठ्याची पाहणी करून जप्तीची कारवाई करणार समजताच  वायाळ यांनी रातोरात त्याठिकाणी असलेला साठा गायब केला असून त्यांनतर देखील दोन्ही तहसीलचे अधिकारी त्या ठिकाणी  प्रत्क्षय पाहणी करून आलेले असतांना सदर ठिकाणी असलेली थोडीफार रेती वायाळ यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात लोटून दिली व रामा धान वायाळ यांच्या वर अध्याप पर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने त्यांच्या कडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून गावकऱ्यांवर दबाव टाकत दहशत निर्माण करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट होत असून महसूल विभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडनार असल्याच्या चिंचखेड इसरूळ येथील नागरिकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Post a Comment

0 Comments