Ticker

6/recent/ticker-posts

देवी प्रियांकाजी यांच्या सानिध्यात काढण्यात आली भव्य मिरवणूक....


श्री राम मंदिर ते लहाने लेआउट मार्गावर भाविकांनी केले स्वागतबुलढाणा:-, सदभावना सेवा समितीच्या वतीने आयोजित संगीतमय राम कथेच्या पार्श्वभूमिवर येथील श्रीराम मंदिर ते  लहाने ले-आऊट पर्यंत सुश्री प्रियंकाजी यांच्या सानिध्यात राममय ,भक्तिमय वातावरणात  मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शहरातील विविध भागातून लहाने ले-आऊटपर्यंत काढण्यात आली, यावेळी विविध परिसरातील भाविकांनी या   यात्रेचे रांगोळी टाकून व फुलांचा वर्षाव करुन स्वागत केले. ही यात्रा सोमवारी सकाळी काढण्यात आली. बुलढाणा येथील  सद्भावना सेवा समितीच्या वतीने शहरवासीयांसाठी श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील लहाने ले-आऊट मैदानावर ७ ते १५ नोव्हेंबर दरम्यान हा दुपारी 1ते 5 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे. सद्भावना सेवा समिती, बुलढाणा ही एक सेवाभावी संस्था आहे जी संभाव्य भक्तांसाठी विविध धार्मिक कथांचे आयोजन करते. प्रभू श्रीरामाच्या भक्तीने भक्तांचा आनंद नेहमीच द्विगुणित केला आहे. म्हणूनच यंदा सद्भावना सेवा समितीने संगीतमय रामकथेचे आयोजन केले आहे. यासाठी सुश्री देवी प्रियंकाजी यांना मथुरा येथून आमंत्रित करण्यात आले आहे. यादरम्यान यावेळी राम कथा, भागवत, भजन संध्या, संगीतमय श्री राम चरित्र आदी कार्यक्रम होणार आहेत. सोमवार पासून सुरु करण्यात आलेल्या या उत्‍सावाचा समारोप 15 नोव्हेंबरला केला जाणार  आहे.   यादरम्यान शहरातील श्री राम मंदिर परिसरातून  देवी प्रियंका जीं ची रथयात्रा काढण्यात आली. या यात्रेत वारकरी मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या यात वारकरी मंडळ,अंबोडा 

ह.भ.प.भिकाजी महाराज तायडे,अंभोडा

अंबोडा गुरुदेव भजनी मंडळ चिखला 

श्री हरिदास खांडेभराड चिखला  गुरुदेव भजन मंडळी सातगाव.

 प्रमोद महाराज दंडके सातगाव  वारकरी भजन मंडळी गायरान - सागवण

श्री ओकांर अर्जुन फोलाने गायरान 

मुक्ताबाई महिला भजन मंडळ अजिसपूर

माऊली भजन मंडळी अजिसपूर

गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था,अजिसपूर 

गजानन महाराज संस्थान येळगाव

कांताबाई सुरळकर, 

नंदाताई घड्याळे.विठ्ठल भजन मंडळी,शिरपूर-नारायण सुसर भागवत धर्म प्रचारक वारकरी मंडळ. तानाजी नगर,बुलडाणा-गव्हाळे सर

 

गजानन मह संस्थान,जांभरून,बुलडाणा

शिवाजी महाराज मुठ्ठे- बुलडाणा पंचमुखी हनुमान मंडळ जुनागाव,बुलडाणा

महिला वैष्णवी गीता मंडळ- राजगुरे ले आऊट बुलडाणा.

 वारकरी मंडळ राजगुरे,सातपुते महाराज. प्रहाद राऊत उमाठी .

 गणेश केंधडे बुलडाणा कौशल्याबाई गवई बुलडाणा

 यमुनाबाई व्यंबके

 सुभद्राबाई सोयगाव -

 जगदेव पवार अजितपूर

   या सर्वांचे स्वागत सदभावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले.


सर्व दिडी प्रमुखांचे सद्‌भावना सेवा समितिचे अध्यक्ष राध्येश्याम चांडक यांनी शाल श्रीफळ देवून स्वागत केले. त्‍यानंतर ही रथयात्रा कारंजा चौक, जयस्तंभ चौक, संगम चौक, गजानन महाराज चौक  मार्गेने लहाने ले आउट पर्यंत काढण्यात आली. यावेळी शहरातील नागरिकांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व स्वागत कमानी उभारुन  शोभायात्रेचे उत्‍स्फूर्त  स्वागत केले.

यावेळी सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलढाणा अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.सुकेश झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा  सौ. कोमलताई झंवर, सद्भावना सेवा समितीचे कार्यकारिणी सदस्य राजेश देशलहरा, गोपाल चिरानिया, आदी उपस्थित होते.


या संगीतमय रामायणासाठी काढण्यात आलेल्या रथयात्रेत अनेक महिलांनी सारख्या रंगाचे वेशभूषा धारण केल्याने शोभायात्रेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले.  या महिलांनी तुळशी वृंदावन घेवून लहाने ले आउट येथे असलेल्या सभामंडपात प्रवेश केला. तसेच शहरातील अनेक तरुणींनी भगवान श्री राम,  सीतादेवी आणि लक्ष्मण, हनुमान यांची वेशभूषा सादर केली. जे आकर्षणाचे केंद्र बनले.

Post a Comment

0 Comments