Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक; विमा भरून सुध्दा शेतक:यांना लाभा पासुन वंचित राहण्याची आली वेळ

gopal nikas


कंपनीच्या जाचक अटी मुळे शेतकरी लाभा पासुन वंचित राहण्याची शक्यता

गोपाल निकस/मेहकर

विदर्भदूत न्यूज नेटवर्क

जानेफ ळ परिसरासह तालुक्यात या वर्षी सोयाबीन पिकाला खूप संकटाचा सामना करावा लागला ऐन तोंडी घास आल्यावर येलो मोज्याक व खोड किडा ही बीमारी आली त्या मुळे उत्पन्नात घट झाली आणि ऐन सोयाबीन सोंगणी ला आली असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी यांचे आतोनात नुकसान झाले.

या मधे 60ते 70 त्न शेतकऱ्यांनी विमा भरलेला असुन सुद्धा कंपनीच्या जाचक अटींमुळे त्यांना आता लाभापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे अशी चर्चा शेतकरी वर्गात दिसून येत आहे

कंपनीच्या नियमाप्रमाणे  नुकसान झाल्यापासून 72 तासाच्या आत कंपनीला ऑनलाईन तक्रार करणे बंधनकारक आहे शेतकरी यांचे सांगणे वरून या 72 तासा मधे नेटवर्क ची अडचण ऐप ओटीपी आणि आपली वैयक्तिक कामे या कारणामुळे 72 तासात तक्रार करणे शक्य नाही

कारण विभागात नुकसान झाल्यापासून सर्वच शेतकरी सेंटर वर गर्दी करतात आणि नेटवर्क सुद्धा बिझी असते त्यामुळे तक्रार वेळेत करता येत नाही तक्रार केली नाही मंहजे नुकसान झाले नाही असे होत नाही 

अजूनही पाऊस थांबायचे नाव घेत नाही नुकसान होण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही.

कंपनीने अश्या जाचक अटी न लावता कोणत्या विभागात किती पाऊस झाला याचा डाटा उपलब्ध ठेऊन ज्या शेतकरयांनी विमा भरला असेल आणि त्यांचे नुकसान झाले असेल अश्या शेतकऱ्याला सरसकट विमा मंजूर करून मदत देण्याचे करावे अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहेत 

या मधे सावत्रा,रायपूर,दुधा, सोनार गव्हाण, जाणेफळ,वाडी,नायगाव अशी जाणेफल मंडळातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments