Ticker

6/recent/ticker-posts

सप्तरंगाची उधळण "युवा महोत्सव २०२२"

 


अकोला: डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन "युवा महोत्सव" ची सुरुवात विद्यापीठाचे नवानियुक्त कुलगुरू डॉ शरद गडाख यांचे हस्ते झाली अत्यंत देखना सोहळा पार पडला उद्घाटन प्रसंगी कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हिने "हर हर शंभु" या गाण्यावर नृत्य करून अतिथी व उपारचितांचे नृत्याची चुनुक दिली.

        उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर नियोजित कार्यक्रमामधे एकुण ३६ कृषी महाविद्यालयांनी भाग घेतला असुन दि ११ ऑक्टोबर रोजी मुख्य सभागृहामध्ये गायन या प्रकारामधे सर्व गायन प्रकारामधे एकुण १६ विदर्भातील कृषी महाविद्यालयांनी भाग घेतला.तसेच "फाइन आर्ट्स "या प्रकारामधे एकुण २० विद्यार्थ्यांनी भाग घेवुन रांगोळी, कोलाज,स्पॉट पेंटींग, व फोटोग्राफी इत्यादि मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना व कला क्षमताचे उत्कृष्ट प्रदर्शन केले विशेष म्हणजे शहरातील हौसी लोकांनी याला दाद दिली. वादविवाद गोष्ट प्रसंगी तथा इतर प्रकारामधे २१ महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला व आपल्या काव्यप्रचुर्य तथा वकृत्वाचे उत्कृष्ट सादरीकरण केले यामधे प्रा. डॉ मोहन खडसे ,ॲड सौ मनीषा धूत, प्रा.जयश्री बंड यांनी परीक्षण केले.सदरच्या एकुण कला प्रकारामध्ये गायन स्पर्धेकरीता प्रा.अनिल निंबाळकर मा श्री गोपाल राऊत ,श्री श्याम कोल्हाड यांनी परीक्षणाची भुमिका पार पाडली तसेच

दि.१२ ऑक्टोबर ला नृत्य विभागामधे वैयक्तीक पारंपारीक नृत्य तथा समुह नृत्य चे आयोजन करण्यात आले यामधे एकुण ३० कृषी महाविद्यालयांचे चमुने उत्कृष्ट प्रस्तुतिकरण केले विविध रंगाचे पोषाख उत्कृष्ट संगीताची साज तथा सदरिकरणामधे नृत्याचे उत्कृष्ट पदलालीत्य चे प्रदर्शन केले या  प्रकारामधे परिक्षक म्हणून कु. भावना गिरीश याज्ञीक ,डॉ अर्चना सतीश भट, सौ. मनिषा प्रशांत गावंडे यांनी अगदी चिकीत्सक तथा अनुभवावर पारदर्शक परिक्षण केले.


विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दिलेले पाठबळ याचा विचार करून सहभागी विद्यार्थांनी कुलगुरूंच्या वचनाला साद देऊन विविध कला प्रकारामधे संपुर्ण क्षमतेवर तसेच विविध कसोटींना उतरून आंतर विद्यापीठ स्पर्धेत कृषी विद्यापीठाचे नाव लौकीक करण्याचे आश्वासन दिले.राजभवना तर्फे घेण्यात येणारी "इंद्रधनुष्य" आंतरविद्यापीठ कला महोत्सव यावर्षी यजमान पद महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे नोव्हेंबर मध्ये आयोजित करण्यात  येत आहे हे वैशिष्टयपूर्ण आहे. या युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. पि के नागरे  तथा समन्वयक डॉ एम वी तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांच्या अपार कष्टातून संपुर्ण युवा महोत्सव यशस्वी संप्पन्न होणार आहे.

Post a Comment

0 Comments