Ticker

6/recent/ticker-posts

रक्तदानाच्या महायज्ञास प्रा. डॉ. संतोष हुशे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा



अशोक वाटीकेत ५३ रक्त बॉटलचे संकलन
वाडेगावात ५३ बॉटल रक्त संकलीत
वाडेगावमध्ये नेत्रतपासणी व मोफत चश्मे वाटप
जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्नांना अल्पोपहार सह फळवाटप
बाळापूरातील ग्रामिण रुग्रालयात फळवाटप

प्रतिनिधी/२९ जुलै २०२२-अकोला- विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योजक तथा ओबीसी नेते प्रा. डॉ. संतोष हुशे यांचा त्र्येपन्नांवा वाढदिवस विविध शिबीर व कार्यक्रमांसह अकोला जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

अकोला जिल्ह्यातील नामांकीत उद्योजक, ओबीसी समाजाचे राज्यपातळीवरील नेते तथा शिक्षणतज्ञ समाजसेवक प्रा. डॉ. संतोष हुशे यांचा वाढदिवस आज विविध कार्यक्रमांसह संपूर्ण अकोला जिल्ह्यात सर्वपक्षीय मित्रमंडळींनी मोठ्या उत्साहात साजरा केला. जिल्ह्यातील विविध भगात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. केवळ दिखावा न करता विविध समाजयपयोगी कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध संस्था व संघटनांनी सक्रीय सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यामध्ये सर्वपक्षीय नेतेमंडळी, उद्योजक, साहित्यीक, समाजसेवी गणमान्य व्यक्तींनी सहभाग नोंदविला होता.

अकोल्यातील अशोक वाटीका येथे ५३ बॉटलचे रक्तसंकलन



परिवर्तन फाऊंडेशन अकोला यांच्या वतीने दानात दान रक्तदान असलेल्या रक्तांचे यावेळी प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त संकलन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या आवाहनाला व डॉ. हुशे यांच्यावरील प्रेमाला साद देत जवळपास ५३ बॉटल रक्त संकलीत करण्यात आले. यावेळी तरुणांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. व यापुढेही सामाजिक जाणीव लक्षात घेऊन रक्तदानासाठी सदैव तत्पर राहु असा आशावाद व्यक्त केला.

वाडेगावात ५३ बॉटल रक्त संकलीत

वाढदिवसाला कोणताही बडेजाव न करता सामाजीक उत्तरदायीत्वाची भावना लक्षात घेत प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेगाव येथे प्रा.डॉ. संतोष हुशे मित्रमंडळ वाडेगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबीराचे उद्घाटन प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाडेगांव व परिसरातील युवकांनी रक्तदानामध्ये हिरीरीने सहभाग नोंदवित जवळपास त्यांच्या त्रेपन्नांव्या वाढदिवसानिमित्त ५३ बॉटल रक्त संकलीत करण्यात आले. यावेळी हेडगेवार रक्तपेढी अकोला यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संकलीत करण्यात आलेले रक्त सदर रक्तपेढीकडे सूपूर्द करण्यात आले.

वाडेगावमध्ये नेत्रतपासणी व मोफत चश्मे वाटप

आज ग्रामिण भागातील अनेकांना दिसण्याच्या म्हणजेच डोळ्याच्या समश्या आहेत. ग्रामिण भागातून शहरात येऊन डोळ्यांची तपासणी करणे अनेकांना शक्य होत नाही. या व अशा अनेक अडचणींना लक्षात घेऊन प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडेगामध्ये मोफत भव्य नेत्रतपासणी व चश्मे वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाडेगाव व परिसरातील शेकडो रुग्रांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी जवळपास २५३ चश्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. अनेकांनी पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉ. निलेश वानखडे व हुशे बंधु ऑप्टीकल्स यांचे मोठे सहकार्य लाभले.



जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्नांना अल्पोपहार सह फळवाटप

अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात आजघडीला शेकडो महिला रुग्र उपचार घेत असतात. प्रा. डॉ. संतोष हुशे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा स्त्री रुग्रालयात रुग्रांना अल्पोपहार व फळवाटप करण्यात आले. यावेळी मायाताई ईरतकर, उमेश म्हसणे, नितिन सपकाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी शेकडो महिला रुग्रंाना अल्पोपहार व फळवाटप करण्यात आले.

बाळापूरातील ग्रामिण रुग्रालयात फळवाटप

ग्रामिण रुग्रालय बाळापूर येथे वाढदिवसाच्या औचीत्यावर प्रा. डॉ. संतोष हुशे मित्रमंडळ यांच्या वतीने रुग्रांना फळवाटप करण्यात आले. यावेळी बाळापुरातील अनेक स्नेही उपस्थित होते.

यासह जिल्हाभरात विविध ठिकाणी विविध लहान मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अकोला शहरातील रहिवाशी असलेले व संपूर्ण विदर्भाला एक दानशुर व्यक्तीमत्त्व म्हणून परिचीत असलेले प्रा. डॉ. हुशे यांचा वाढदिवस म्हणजे आपल्या घरातीलच एकाचा वाढदिवस असल्याची भावना सर्व जिल्हाभर यादिवशी ऐकायला मिळाली हे विशेष. यामध्ये प्रा. डॉ. संतोष हुशे यांचा स्वभाव सर्वांसाठी प्रिय असल्याचे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन डॉ. अशोक घाडगे, नितीन सपकाळ, अॅड आकाश भगत, किरण शिरसाठ, अनुरुद्ध वानखडे, आशिष सरपाते, अनुप वानखडे, आशिष सोनोने, जय तायडे, श्रीकांत घोगरे, विकास संदांशिव, राजेश वाहुकार, प्रविण वाघमारे, प्रविण निलखण, प्रविण वानखडे, शरद इंगोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. याच्यासह अनेक सामाजिक कार्यकत्र्यांसह, मित्रपरीवारासह सर्वांनीच मदत केली व परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments