Ticker

6/recent/ticker-posts

सावता महाराज यांनी कर्माधिष्ठित अध्यात्मवाद मांडला- डाँ प्रकाश वानखडे अकोला-  हाती काम,आणि मुखी नाम ,या तत्वाने कर्म करत,श्रध्दापुर्ण अनुतापयुक्त भक्तीने ईश्वराची भेट होते,ईश्वर प्राप्ती करीता व्रत वैकल्यापेक्षा ,काया,वाचा, व मनाची शुध्दता असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमातील आपल्या प्रवचनातुन प्रा डाँ प्रकाश महाराज वानखडे यांनी केले. स्थानिक गुरुकृपा,मंगल कार्यालय येथे माळी समाजाच्या वतीने श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला होता.यावेळी पौराणिक कथा,ईतिहासातील दाखले  सावता महाराजाचे अभंग यांच्या आधारे महाराजाच्याआध्यात्मिक सेवेसह त्यांचा जिवनपट मांडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत महाराजाच्या पादुकांचे व प्रतिमांचे माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार श्री बळीरामजी शिरस्कार,प्रा डाँ संतोष हुशे,अकोल्याच्या सौ अर्चनाताई मसने,श्री जयंतराव मसने.,श्री प्रकाश दाते,श्री संतोष अढाऊ,श्री मनिष हीवराळे,श्री प्रभाकर बोळे श्री प्रवीण वाघमारे,श्री सुनिल ऊंबरकर, श्री लक्ष्मणराव निखाडे ,श्री महेद्र काळे,श्री सम्रारीतकर,सौ मायाताई ईरतकार,श्री आशिष ढोमणे,श्री ऊमेश मसने आदी मान्यवरांच्या हस्ते सपत्निक पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलनातुन कार्यक्रमाची भूमिका  प्रा श्रीराम पालकर यांनी मांडली . प्रा.डाँ संतोष हुशे सौ.हेमा हुशे ,श्री अँड.संतोष राहाटे, श्री शंकरराव गिर्हे, सुभाष सातव ,श्रीमती वनिताताई राऊत, श्रीमती सुमित्राता नीखाडे , डाँ अशोकराव गाडगे, यांच्या  हस्ते महाआरती करण्यात आली.महाआरतीनंतर  ऊपस्थितानी महाराजाच्या पादुकांचे पुजन केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता  श्री गणेश गोलाईतप् प्रमोद लांजेवार,,श्री बाळू काळे, श्रीकांत डाये यांनी यशस्वी प्रयत्न केले

Post a Comment

0 Comments