Ticker

6/recent/ticker-posts

लाचखोर सह-संचालक डॉ.मुरलीधर वाडेकर यांचे अजूनही निलंबन नाही .लाचखोर सह संचालकला अभय कुणाचे ?अमरावती प्रतिनिधी :महाराष्ट्र शासनाच्या अमरावती विभागातील उच्च शिक्षण विभागाचे सह-संचालक डॉ.मुरलीधर वाडेकर यांना दिनांक 30 जून 2022 रोजी सहयोगी प्राध्यापकांची वेतन निश्चिती करण्यासाठी 30,000 हजाराची लाच घेताना  अँटी करप्शन ब्युरो,अमरावती यांनी रंगेहात पकडले असून अजून पर्यंत निलंबित करण्यात आले नाही.
         डॉ.मुरलीधर वाडेकर यांना  दि. 1  ते 4 जुलै 2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला होता. तर  4 -18 जुलै 2022 पर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड दिला होता परंतु मुरलीधर वाडेकर यांना जामीन प्राप्त झाला अशी माहिती शासकीय कार्यालयातून प्राप्त होते आहे.
शासनाच्या नियमानुसार 48 तासांपेक्षा जास्त वेळ जर शासकीय कर्मचारी अटकेत असेल तर त्याला तात्काळ निलंबित केलं जाते. परंतु डॉ.मुरलीधर वाडेकर यांना अजून पर्यंत निलंबित करण्यात आलेलं नाही.
एवढेच नव्हे तर 11 जुलै 2022 रोजी आपल्या पूर्व पदावर रुजू होण्यासाठी सुद्धा शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती येथे रुजू होण्यासाठी गेले होते परंतु संचालक डॉ. अंजली देशमुख यांनी रुजू करून घेण्यास नकार दिला.
त्यामुळे शासन भ्रष्टाचारी व्यक्तीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आहे की काय अशी चर्चा होते आहे. एकीकडे दुसरी पण चर्चा होत आहे की एका राजकीय पक्षाच्या उच्च पदस्थ व्यक्तीचा डॉ.मुरलीधर वाडेकर यांचा भाऊ पर्सनल असिस्टंट असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होते आहे असं सुद्धा बोलले जात आहे.
शिक्षणाच्या या पवित्र क्षेत्रांमध्ये अशा भ्रष्टाचारी लोकांना शासन पाठीशी घालत असेल आणि जो राजरोसपणे आपल्याच कार्यालयामध्ये 20,000,30,000 व 50,000 अशी वेगवेगळ्या स्थान निश्चितीसाठी वेगवेगळे अप्रत्यक्ष रेट बोर्ड लावून वसुली करत असेल अशाही व्यक्तीला शासन पाठीशी घालत असेल तरी समाजाला लागलेली कीड कधी संपणार अशा स्वरूपाची चर्चा लोकांमध्ये होत असताना दिसून येत आहे.  या गंभीर प्रकाराकडे शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकांचे लक्ष याकडे लागला आहेत अमरावती विभागाचा लाचखोर माजी सहसंचालक डॉ.मुरलीधर वाडेकर याला निलंबित कधी करणार याच्या प्रतीक्षेत आहे.

Post a Comment

0 Comments