Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी कारखानदार झाला पाहिजे या कै. वसंतराव नाईक साहेबांचे स्वप्नपूर्तीसाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज :- इंजि अमर राठोड

 


 कृषी विद्यापीठात "कृषी दिन" उत्साहात साजरा!



 "शेतकरी सुखी तर देश सुखी" हा मूलमंत्र संपूर्ण जगाला देणाऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक साहेबांच्या स्वप्नातील राष्ट्र निर्मितीसाठी शेतीला उद्योगाचा दर्जा देत शेतकरी कारखानदार होणे काळाची गरज असून याकरिता सर्वच घटकांच्या एकात्मिक प्रयत्नांची मोट बांधणे कालसुसंगत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. अमर राठोड यांनी आज केले. कै. वसंतराव नाईक यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे कृषी महाविद्यालय अकोलाच्या समिती सभागृहात आयोजित  कार्यक्रम प्रसंगी विशेष अतिथी म्हणून  उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.   आपल्या अतिशय अभ्यासपूर्ण आणि शैलीदार उदबोधनामध्ये श्री.अमर राठोड यांनी कै. वसंतराव नाईक साहेबांच्या अनेकानेक स्मृती जागृत केल्या . अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी भीष्मप्रतिज्ञा करणारे मुख्यमंत्री म्हणून कै. नाईक साहेबांचा जीवन प्रवास निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी उपस्थितांना अवगत केले. जमीन सुधारणा कायदा, रोजगार हमी योजना, कापूस खरेदी योजना, साखर कारखान्यांची निर्मिती यासह पाझरतलाव, नालाबंडिंग अशी नानाविध उपक्रमांची मालिका नाईक साहेबांनी आपल्या कार्यकाळात राबवित राज्याला देशपातळीवर अग्रस्थानी नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केल्याचे श्री राठोड यांनी पुढे बोलताना सांगितले. तर राज्यातील कृषी विद्यापीठांच्या निर्मितीमध्ये कै. वसंतराव नाईक साहेबांचे धोरणात्मक योगदान असून राज्यातील कृषी विद्यापीठांनी कै. नाईक साहेबांना अभिप्रेत कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची चतुसूत्री अंगीकारत शेती शाश्वत आणि  शेतकरी संपन्न होण्यासाठी आपली कार्य पद्धती काळानुरूप अंगीकारली असल्याचे आश्वासक प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात  व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. ययाति तायडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई यांचे सह शेतकरी प्रतिनिधी श्री. श्रीकृष्ण ठोंबरे यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे माजी   कृषिमंत्री श्री दादाजी भुसे साहेबांचे संकल्पनेतून कै. वसंतराव नाईक साहेबांचे जयंती दिनानिमित्त दिनांक 25 जून ते 1 जुलै दरम्यान "कृषी संजीवनी सप्ताहाचे" आयोजन कृषी विभागाचे सहयोगातून संपूर्ण विदर्भ स्तरावर करण्यात आले असून आज या कृषी संजीवनी सप्ताहाची सुद्धा सांगता या कृषी दिनाच्या निमित्ताने होत असल्याचे कार्यक्रमाचे आयोजक तथा संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेंद्र गाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केले. या संपूर्ण सप्ताह दरम्यान कृषी विद्यापीठ अंतर्गत सर्वच कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्र, तथा कृषी विज्ञान केंद्र यांचे सह राज्य शासनाचा कृषी विभाग, प्रकल्प संचालक आत्मा आणि इतर संस्थांचे प्रति समाधानाची भावना व्यक्त करताना डॉ. गाडे यांनी एकात्मिक प्रयत्नातून फायदेशीर शेतीचे तंत्रज्ञान कृतीत येणार असल्याचे नमूद केले. याप्रसंगी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण संस्था डॉ. धनराज उंदीरवाडे,  सह अधिष्ठाता निम्न कृषी शिक्षण प्रा. बाबाराव सावजी, अधिष्ठाता शिक्षण डॉ. नितीन कोष्टी, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. किशोर कुबडे यांचे सह सर्व  कृषी शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी- कर्मचारी,  विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण  संचालनालयातील सर्वच अधिकारी कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले. यांचे सह सर्व वर्ष कृषी शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी- कर्मचारी,  विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी विस्तार शिक्षण  संचालनालयातील सर्वच अधिकारी कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments