Ticker

6/recent/ticker-posts

जी.प.आणी पं.स. सोबतच नगरपालिका निवडणुक लढवणार रयत क्रांती संघटना

 


कार्यकर्त्यांनी कामाचा वेग वाढवा - जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे

बुलढाणा-रयत क्रांती संघटनेने येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका लढवन्याचा निर्णय घेतला असून संघटनेचे सर्वेसर्वा माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या आदेशावरून रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या अनेक दिवसांपासून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणूका महाराष्ट्रभर लढवणार असल्याचे समजते व त्यासाठी कार्यकर्त्यांची तयारीदेखील सुरू आहे.


त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका लढविणार असल्याचे रयत क्रांती संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष श्री.तुषार काचकुरे यांनी म्हटले आहे.

तसेच खुप जागा लढवून इतरांना अडचणीत आणण्यापेक्षा मोजक्याच जागा लढवून त्या निवडून येण्यावर अधिक भर देण्यात येईल असेदेखील यावेळी त्यांनी म्हटले.

त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाचा वेग वाढवावा असेदेखील जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे यांनी म्हटले आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणुका स्वबळावर लढवायच्या की एखाद्या पक्षाबरोबर युती करून लढवायच्या याबाबद आद्यपतरी काही ठरले नसून.

एखाद्या पक्षाकडून विचारणा होऊन सन्मानजनक जागा मिळाल्यास युतीचा विचार करण्यास हरकत नसल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार काचकुरे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments