Ticker

6/recent/ticker-posts

प्रा. मुकुंद भारसाकळे सरांचे कार्य समाज उन्नतीकडे नेणारेनिवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांचे प्रतिपादन

अकोला : वर्‍हाड विकास बहुउद्देशिय क्रीडा व शिक्षण मंडळ खडकी बु. संस्थेतर्पेâ महाराष्ट्र दिन व साहित्यिक पंजाबराव वर यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा प्रबोधनभवनाचे शिल्पकार सन्माननीय प्रा. मुकुंद भारसाकळे सत्काराचे आयोजन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे म्हणाले की, प्रा. मुकुंद भारसाकळे सरांनी जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे कार्य केल्यामुळे व त्यांच्या कार्यातून समाजाची उन्नत्तीचा मार्ग दिसत असल्यामुळे त्यांचा सत्कार पंजाबराव वर यांच्या वाढदिवशी करण्यात आला हा जणू दुग्धशर्करा योग असल्याचे ते बोलतांना म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त तहसीलदार आत्माराम तेलगोटे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा माहिती अधिकारी सन्माननीय डॉ. मिलिंद दुसाने साहेब, अकोला जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक/रजिस्टार सन्माननीय सुनील पाटील साहेब, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सी.एन. वानखडे, अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शंकर ढोले साहेब,   बहुजन नेता तथा समाजसेवी व्यक्तीमत्व सन्माननीय प्रा.डॉ. संतोष हुशे सर, प्रसिद्ध वकील अ‍ॅड. प्रवीण तायडे  साहेब, अकोला बार असो.च्या महिला उपाध्यक्षा अ‍ॅड. कांचन शिंदे मॅडम, स्मॉल अ‍ॅण्ड मेडीयम न्यूज पेपर संघटनेचे विदर्भ  प्रमुख संतोषभाऊ धरमकर, विदर्भदूत न्यूज चॅनलचे संपादक संजय निकस होते. यावेळी बोलतांना अ‍ॅड. प्रवीण तायडे म्हणाले की, कर्मयोगी तथा प्रबोधनभवनाचे शिल्पकार प्रा.  मुकुंद भारसाकळे यांचा सत्कार खर्‍या अर्थाने होत आहे व यासाठीही मोठ्या मनाची आवश्यकता आहे. पंजाबराव वर यांनी त्यांच्या संस्थेमार्फत त्यांचे वाढदिवसाचे दिवशी सरांच्या कार्याचा गौरव हा समाजासाठी चांगला संदेश असल्याचे म्हणाले. जिल्हा माहीती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने बोलतांना म्हणाले की,  समाजामध्ये जर चांगले कार्य करणारे व्यक्तींचा सन्मान होत असेल तर त्यांना पुढील कार्य करण्यासाठी निश्चीतच उर्जा प्राप्त होऊ शकते. अशा कार्यक्रमांला मला उपस्थित राहता आलं माझं भाग्य समजतो.
यावेळी अ‍ॅड. शंकर ढोले, अ‍ॅड. सी.एन. वानखडे : सारंग निखाडे, अ‍ॅड. इंगळे यांचीही भाषणे झाली.  सत्कार कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे सन्माननीय रमेश तायडे साहेब, से.नि. विलास धांडे साहेब, बौद्ध विचाराचे प्रचारक अशोक इंगळे गुरुजी, सुप्रसिद्ध गायक गणेशराव इंगळे, संभाजी चावरे, सुप्रसिद्ध कवी, गितकार, साहित्यिक अर्जून घुगे बंधू, तुषार हांडे साहेब, प्रवीण मोहोड साहेब, अ‍ॅड. भारत सावळे, अ‍ॅड. सुमेध डोंगरदिवे, अ‍ॅड. सतीश तायडे, अ‍ॅड. विजय वानखडे, अ‍ॅड. एकनाथ चक्रनारायण, अ‍ॅड. अमोल चक्रे, ओरा चक्रे सर, प्रमोद इंगळे,  मेजर गवई, ज्ञानदेव खंडारे गुरुजी, रामकुमार खंडारे, उल्हासराव मोहोड, उल्हास इंगळे, नितीन मोरे, आशिष बंड, अ‍ॅड. एम.एस. इंगळे, दिपक ताजणे, इंजिनिअर लांडे, मराठा सेवा संघाचे तसेच संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी प्रमोद मुरुमकार, प्रा. विनायक धोरण सर, श्रीकृष्ण माळी, प्रजानंद उपर्वट, प्रकाश जंजाळ, रत्नाकर भुजाडे, रमेश बदरखे, संतोष घोडे, योगेश काटोके, वैभव डिंकुटवार, मनिष डिंकुटवार,  भागवत डामरे, ज्ञानदेव डामरे, छत्रपती यंग ब्रिगेडचे अध्यक्ष रोशन गायकवाड, अतूल तळेगांवकर, प्रभाकर आडोळे, गजानन खिराडे, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन संजय निकस यांनी मानले.

Post a Comment

0 Comments