Ticker

6/recent/ticker-posts

28 मे रोजी अकोल्यात पहिले वैदर्भीय युवा आविष्कार कला साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी शंकर जोगी कार्याध्यक्ष पदी नीरज गायकवाड

Shankar jogi



अकोला (प्रतिनिधी): मलकापूर येथील युवा पत्रकार तथा आसरा मीडियाचे संचालक शंकर जोगी यांची नुकतीच तरुणाई फाउंडेशन आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित पहिल्या वैदर्भीय कला युवा आविष्कार कला साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी समाजसेवक नीरज गायकवाड यांनी निवड करण्यात आली आहे. शनिवार 28 मे रोजी पिकेव्हीच्या कृषी महाविद्यालयात ठाकरे सभागृहात सकाळी 9 वाजता ते संमेलन आयोजित करण्यात आले आहे. प्रसिद्ध कवी सु.पू. अढावूकर हे संमेलन अध्यक्ष असतील. आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. संमेलनात गझल, मुशायरा, कवी संमेलन, परिसंवाद, पुरस्कार सोहळा अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शहरातील विविध  उपक्रमात नेहमी अग्रेसर असणारे शंकर जोगी हे एक सुपरहित समाजसेवक म्हणून विदर्भात सर्वदूर परिचित आहेत. त्यांची तरुणाई फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी या पहिल्या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत त्यांची सदस्यपदीही निवड करण्यात आली.यावेळी अनुमोदक म्हणून सुप्रसिद्ध गीतकार सु. पू अडवकर, पत्रकार धनंजय मिश्रा , डॉक्टर निलेश पाटील, ऍड संतोष गावंडे उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप देशमुख, गणेश मेनकार , प्रशांत वरईकर , आकाश डाहोलकर, सुनील दिवणाले,  सचिन नागे ,  तेजस बच्चे , संतोष इंगळे, गजानन शबीले, सूर्यकांत शास्त्री, रवी शर्मा ,सुनील लव्हाळे आदींची यावेळी उपस्थिती होती.दरम्यान, माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांचे व माझी नियुक्ती केली त्यांचे  आभार मानतो, असे शंकर जोगी यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments