Ticker

6/recent/ticker-posts

चैतन्य फुलविणारे प्रा.संजय खडसे

मॅंरेज एनिवर्सरी अभिष्टचिंतन 

sanjay khadse rdc akola 1


... सुगंधाचे दान देणारे काही माणसं निसर्गाने अशी घडवली आहे,जी सदैव देत आणि देतच राहतात.आणि देताना त्यांचे हात कधी सुगंधी होतात त्यांनाही कळत नाही.केवळ सुगंधच नाही तर आनंद, समाधान, सहकार्य,जीव ओतून सेवाभाव, प्रेरणा आणि बरचं काही... असं व्यक्तिमत्व प्रा.संजय खडसे (सर) निवासी उपजिल्हाधिकारी अकोला यांच्या अंतरंगात ठासलेले दिसते.

प्रा.संजय खडसे म्हणजे उपजत बुद्धिमत्ता लाभलेले व्यक्तिमत्व,प्रेम, जिव्हाळा व बंधुता याचा संगम असलेल्या सरांनी आपल्या कार्यक्षमतेने अवघे प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व,वकृत्वातून चैतन्याचा झरा पाझरतो आहे. आपल्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेऊन, प्रशासकीय सेवेतून कामाला सुरुवात करणारे,उत्तम प्रशासक,उत्तम वक्ता, थोरामोठ्यांचा सहवास लाभलेले, साहित्य रसिक, कलावंत व माणसांच्या सहवासासाठी सतत तहानलेले बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे अकोला जिल्हाचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे.

sanjay khadse rdc akola 2


अशा अनेक गुणवैशिष्ठ्यांनी भारुन गेलेले व्यक्तिमत्व, अंगभूत गुणवत्ता,कल्पकता व अविरत कष्टाची तयारी असेल तर एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती काय करु शकते,याचा ते आदर्श आहेत.अशा या कर्तृत्ववान, सळसळत्या चैतन्य फुलवणारे प्रा.संजय खडसे व पत्नी सौ निता संजय खडसे यांच्या अभिष्टचिंतन  सोहळ्यानिमित्त माझ्या सारख्या श्री,संतोष अवसरमोल पत्रकारांच्या लेखणीतून त्यांच कर्तुत्व, वकृत्व, नेतृत्व आणि दातृत्वावर लिहिणं म्हणजे उगवत्या सूर्याला आकाशी कंदील दाखविणे होऊ शकते.

माझ्या लेखणीच्या शब्दाशब्दातून त्यांच व्यक्तिमत्व, पराकोटीची शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, दूरदृष्टी, चौकस बुद्धी, नि:स्वार्थ सेवा,कष्ट, परिश्रम, व जिद्द, मातृत्व, पितृत्व, बंधुत्व, असं सगळं काही आगळेवेगळे अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर लिहण्याचे धाडस करतो.कारण त्यांच्या जीवनचरित्रावर आजपर्यंत असंख्य नामवंत साहित्यिक लेखक,पत्रकारांनी शब्दशब्द करुन उज्जाळा दिला आहे.तरी सुध्दा त्यांच कर्तुत्व, वकृत्व, मी शब्दबद्ध करतं आहो.

अशा चैतन्य फुलवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्रा.संजय खडसे यांची अर्धांगिनी सौ निता खडसे सुखी संसार सूर्याच्या तेजाप्रमाणे उजळत राहो, बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,हयाच सर्वप्रथम लग्न वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा...!

स्तिमित करणारे कोणतेही यश मोठ्या समूहातही उठून दिसते.साहजिकच सा-यांच्या नजरा या यशाच्या तेजाने उजळून जातात.आणि त्याचवेळी त्या यशाच्या राजमार्गाचा शोध घेऊ लागतात.प्रत्येकालाच यशाची,मानमरातबाची, मोठ्या अधिकारपदाची जबरदस्त तृष्णा असते.ही तृष्णा हेही यशाच्या आकर्षणाचे एक कारण असते.

sanjay khadse rdc akola 3


कारण,संघर्ष मानवी जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे. संघर्ष दिशाहीन असला की, माणसांची होते माती. विकासाची थांबते गती. अनमोल असणारे जीवन होते मातीमोल. संघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही. पण, त्याच्या संघर्षाला दिशा हवी. दिशाच नसेल तर संघर्ष वाया जाईल. त्याचे संपूर्ण जीवन प्रवास अस्पष्ट होईल. खूप संघर्ष करून दिशाहीन, बेफाम धावणा-या अस्वस्थ माणसांच्या अवस्थेतून चांगले निर्माण होण्याऐवजी वाईटच निर्माण होईल. ते मानवी विकासाला, समाज परिवर्तनाला व राष्ट्र उभारणीला बाधा करेल.

काही लोक आयुष्यभर संघर्ष करतात, पण निश्चित दिशा नसल्यामुळे मानवी विकासाच्या उत्थानाकरिता योगदान देऊ शकत नाहीत. ती माणसे स्वत:चा उत्कर्षही करू शकत नाही. कोणत्याच प्रकारची जबाबदारी पेलू शकत नाही.इतिहासाची पाने पलटली असता,आपल्या निदर्शनास येईल की, संघर्षातून अनेक माणसे पुढे आलीत. त्यांच्या संघर्षाला एक निश्चित दिशा होती. ती फिनिक्ससारखी शून्यातून पुढे आली. त्यांनी समाजाच्या कल्याणाकरिता योगदान दिले. मातीमोल होणा-या लोकांना जिवंत राहण्याची प्रेरणा दिली. मानवी अस्तित्वाच्या सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिले. लोकांचे, त्याचबरोबर स्वत:चे जीवन अनमोल केले.या समाजात काही माणसे आपल्यासारखीच जन्माला आली. त्यांनी पुढे येण्यासाठी खूप संघर्ष केला. 

Sanjay Khadse RDC Akola Vidarbhadoot Akola Page 2 copy


संघर्ष हा सर्वांच्याच आयुष्यात आलेला असतो. विनासंघर्षाने आयुष्य जगलेच जात नाही.ते समाजाच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करतात आणि चैतन्याचा मळा फुलवतात.तेच व्यक्तिमत्व समाजात दिशादर्शक ठरतं.अशाच बहुआयामी व्यक्तिमत्वाचा प्रेरक प्रवास आज त्यांच्या लग्नवाढदिवसाच्या निमित्ताने ऐकणार आहोत आणि वाचणार आहोत.Óसंघर्षाशिवाय माणूस मोठा होत नाही.अगदी त्याच प्रमाणे प्रा.संजय खडसे हे संघर्षातून फिनिक्ससारखी शून्यातून पूढे आले आहेत.यांचा प्रवास अत्यंत खाचखळग्यांनी भरलेला असून कष्टाच्या व चिकाटीच्या बळावर प्रशासनातील वेगवेगळी पदे भूषवली आहेत.त्यामधून स्वत:च्या मिरासदारीपेक्षा गोरगरिबांचा विकास व्हावा त्यांच जीवन समृद्ध,समर्पित,व्हाव म्हणून मोठ्या उमेदीने लोकाभिमुख प्रशासनासोबत चैतन्य फुलवत आहेत. यांचे आयुष्य म्हणजे एक चैतन्याचा खळाळता झरा आहे.आज वयाची 48 वर्ष ओलांडली तरी त्यात तसूभरही कमी झाली नाही.कुठून येते ही उर्जा? कुठून येतो हा उत्साह! कुठून येतो हा चैतन्याचा बहर,हा वाशिम जिल्ह्यच्या मातीचा गुण आहे.प्रा.संजय खडसे यांचं गाव वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील नांदगाव आहे.याच गावच्या संघर्षाच्या लालमातीत तावून सुलाखून निघालेले एक प्रशासनातील कृतिशील चळवळीच नेतृत्व समाजाला दिशादर्शक ठरतं आहे.रोजच्या अन्नाची ज्याला भ्रांत होती आणि त्यासाठी जीवनाचा संघर्ष त्याच्या पाचवीलाच पुजला होता.अगदी लहान वयापासून कठोर मेहनत करण्याशिवाय त्यांच्यापुढे कोणताच पर्याय नव्हता.परिस्थितीने गरिबीच्या खाईत ढकललं तरी संकटांशी दोन हात करत त्यांनी परिस्थितीच पालटून टाकली,खडतर परिस्थितीचा सामना करत, गवताच्या झोपडीत,अध्र्या उपाशीपोटी राहून शिक्षणाचे धडे गिरवले आहेत.मातोश्री कमलबाई व पिता महादेवराव यांच्या सोबत पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला मिळेल ते काम करत असताना अनवाणी पायाने वाहत्या नदीच्या प्रवाहातून या गावातून त्या गावात शिक्षण घेतले आहे.कारण  शिक्षण हे वाघणीचे दुध आहे जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही  असे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उपदेश केला होता म्हणून त्या विचारांचा प्रभाव लहानपणीच मनांवर प्रतिबिंबित गोठवल्या गेल्यानं संजय खडसे यांनी अनेक अडचणींवर मात करून ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणात फाटक्या तूटक्या कपड्यात शिक्षण घेतलं. त्याच महाविद्यालयाच्या प्रांगणात आज सुटबुटात वावरताना दिसतात.आणि लाखो तरुणांना उर्जा मिळण्यासाठी स्फुर्ती दायक प्रेरणा देतात.त्यांचा तो प्रेरक प्रवास ऐकून, वाचून,आज तरुणाईच्या हृदयात रुंजत आहे.आपण ही प्रा.संजय खडसे सरांच्या सारखं व्हावं म्हणून हजारो तरुणांनी अभ्यासात झोकून दिलं आहे.त्यामुळे एक आदर्श चैतन्य फुलवणारे बहुआयामी व्यक्तिमत्व ठरलेलं आहेत.

काही माणसं पदामुळे मोठे होतात काही पदे माणसामुळे मोठे होतात काही माणसे माणसांच्या मुळे मोठे होतात.असंच एक व्यक्तिमत्व अकोला जिल्हात निवासी उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना समाजसेवेचे हाताला कंगन बांधून कोरोना महामारीच्या संकटात शासनाच्या विविध नियमांची अंमलबजावणी करुन लोकाभिमुख प्रशासन राबवून त्यामध्ये शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मिशन दिलासा उपक्रम राबविले ,तसेच मोर्णा मिशन उत्तमरीत्या प्रभावीपणे राबवून जिल्हासह राज्यात नांवलौकीक केले.त्याही पलीकडे जाऊन पदरमोड करुन अनेक कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली.भटक्या जमातीशी भावनिक नाते जोपासून त्यांना मायेचा आधार दिला.शेकडो गोरगरिबांना कपडे वाटप करुन अनेकदा आर्थीक विवंचनेत असलेल्या मुलांना शालेय शिक्षणात मदत केली.काही तर वधू पित्यांना मुलीच्या लग्नाला मदतीचा हात दिला.अनेक लोकोपयोगी कामे केली.तसेच समाजाला दिशा देण्याचे,लोकाभिमुख करण्याचं काम प्रा.संजय खडसे यांच्या हातून घडत असल्याने असंख्य मानसाची आत्मियतेची नाळ यांच्या भोवताली गुरफटली गेल्यानं केवळ प्रशासनातीलच नव्हे तर समाजातील एवढा लोकप्रपंच यांनी गोळा केला आहे.स्वभावाने शांत,मनमिळाऊ स्वभावाचे दांडगा लोकसंपर्क कायम टिकवून ठेवणारे, लहानाच्या पासून ते थोरामोठ्यांच्या पर्यंत आदराने आणि आपुलकीने,आपल्या शांत आणि संयमी स्वभावाने,सर्वांची मने जिंकणारे आयुष्यमान प्रा.संजय खडसे हे भेटणा-या प्रत्येकाला आपुलकीने विचारपूस करून प्रत्येक कामाची शाहनिशा करत वेळ न घालवता ते काम मार्गी लावण्यासाठी धडपडत करुन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतात.शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून अनेकांचे अश्रु पुसण्याचे काम केले. त्यामुळे आतापर्यंत विविध प्रकारचे पुरस्कार प्राप्त करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला.समाजकार्य करण्यासाठी तुम्ही किती श्रीमंत आहात? दानशूर आहात? हे महत्त्वाचे नसते. मनात जिद्द आणि अंगी कष्ट करण्याची तयारी असली की, याच जिद्दीच्या बळावर तुम्ही समाजात आमूलाग्र बदल घडवून आणू शकता. याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा. संजय खडसे.आजच्या तरुणाईला त्यांच्या स्वप्नांपुढे काही दिसत नाही. आपली स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी तरुणांची मेहनत करण्याची तयारी देखील असते. परंतु, मी आयुष्यात कसा यशस्वी होईल? या गोष्टीचाच विचार प्रत्येकजण करत असतो. जीवनात पुढे जाताना, पैशांमागे धावताना, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना दुस-यांचा, समाजाचा विचार खूप कमीजण करतात. असाच चांगला विचार करणा-यांपैकी हे एक व्यक्तिमत्त्व! स्वत:साठी कोणीही जगेल. परंतु, दुस-यासाठी जगण्यात जीवनाचा खरा आनंद दडलेला आहे, हे सत्य प्रा.संजय खडसे यांना खूप आधीच गवसले होते.

जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,

तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा....

या उक्तीप्रमाणे समाजातील रंजल्या गांजल्या उपेक्षितांचे अश्रू पुसण्याचे महान काम करणारे प्रा.संजय खडसे प्रशासनातील कृतिशील अवलिया म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. मळकटलेले कपडे, अंगाची भयानक दुर्गंधी येणा-या उपेक्षित मनोरुग्णांना त्यांचे कुटुंबीयही सोडून जातात. अशा लोकांना प्रेमाने जवळ घेवून, पोटच्या मुलाप्रमाणे त्यांचे हवे नको ते पाहणारे प्रा.संजय खडसे हे एक अजब रसायन आहे. ज्या ज्या वेळी समाज संकटात सापडतो त्या त्या वेळी ते आपल्या सर्व शक्तिनिशी मदतीसाठी उभे राहतात.

या सर्व समाजोपयोगी कार्याला भरभरून मोलाची साथ लाभली ती म्हणजे यांची अर्धांगिनी, त्यामुळेच समाजातील उपेक्षितांसाठी काम करण्यास बळ मिळाले आहे. सौ निता खडसे म्हणजे  निर्मळ मनाची प्रेम करणारी मातृरुपी झरा आहे.विश्वास आणि नम्रता हे सद्गुण तिच्यात ठासून भरले आहेत.त्यामुळे निताताई वात्सल्यसिंधू आणि करुणेचा जणूकाही सागरच आहे.

घरापासून ते समाजाच्या समाजसेवेसाठी आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यात प्रा.संजय खडसे यांना बौद्धिक कौशल्याला आणि कर्तृत्वाला चालना देण्यासाठी, सामाजिक उंची वाढवण्यासाठी त्या एक समर्थपणे जबाबदारी पेलण्याचे काम करत असतात.जीवनातले कुठलेही चढ- उतार पार करून आपले कर्तृत्व निभावत असतात. 

सोबतच या दोघांना समाजात प्रबोधन करण्याचा छंद असल्याने त्यांनी गित गाण्यातून कोविड लसिकरण,शिवरायांची जयंती आली आणि आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कीर्ती बाबा भीमाची कायम जगात राहील.भीमराया तुज नमो,हृया गीताची उत्कृष्ट कलाकृती तयार केली त्यामुळे  अशा या सिद्धमति मातृत्वाची भावना जोपासणारी सौ निता संजय खडसे व चैतन्य फुलवणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रा.संजय खडसे यांच्या मॅंरेज एनिवर्सरीच्या  लाख लाख शुभेच्छा!

सुख- दुखांच्या वेलीवर

फु ल आनंदाचे उमलू दे

फुलपाखरा सारखे स्वातंत्र्य

तुम्हा दोघांना लाभू दे

नाते तुम्हा दोघांचे

विश्वासाचे जन्मोजन्मी

सुरक्षित राहू दे

मँरेज एनिवर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Post a Comment

0 Comments