Ticker

6/recent/ticker-posts

तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेचे जिल्हा कचेरीवर धरणे

 


अमरावती, संतोष शेंडे,   तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या प्रलंबीत सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे  संघटनेने आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे, याअंतर्गत अमरावतीमध्ये जिल्हाध्यक्ष तहसीलदार निता लबडे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.



नायब तहसिलदार , तहसिलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या शासनस्तरावर प्रलंबीत सेवा विषयक बाबी तात्काळ निकाली काढण्यात याव्यात या अनुषंगाने वारंवार निवेदने देवून तसेच बैठकामधुन पाठपुरवा करण्यात आला . परंतु अद्यापही खालील नमूद सेवा विषयक बाबी शासनस्तरावर प्रलंबीत आहेत . यामध्ये नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे,  तहसिलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे , नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करणे , तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे , नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे , आदी विविध मागण्यांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून याची दखल न घेतल्याने अखेर संघटनेच्या वतीने चार टप्प्यात आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे ,यामध्ये पहिल्या टप्प्यात बुधवारी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले, तर आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली,

 

सोबतच तिसऱ्याटप्प्यात  18 एप्रिल रोजी एक दिवसाची रजा टाकून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे देऊन निषेध व्यक्त करणार आहे ,यानंतरही शासनाने प्रलंबित मागण्यांबाबत ची पूर्तता न केल्यास चार मे पासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तहसीलदार नीता लबडे यांनी दिला आहे,

आंदोलनामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी रंजीत भोसले, सुनिल रासेकर ,योगेश, संतोष काकडे, प्रविण देशमुख, निकेता जावरकर, अरविंद माळवे ,वैभव फरतारे, अशोकका ळीवकर,आदींसह

जिल्ह्यातील तहसीलदार ,नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments