Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षणातील खंड भरुन काढण्यासाठी 'शाळापूर्व तयारी अभियान; घाटबोरी जि. प. प्राथमिक शाळेचा उपक्रम

Ghatbori mehkar school news


 संतोष अवसरमोल

विदर्भदूत वृत्तसेवा /मेहकर शिक्षणातील खंड भरुन काढण्यासाठी आणि विद्याथ्र्यांना घडविण्यासाठी मेहकर तालुक्यामधील घाटबोरीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडून 'शाळापूर्व तयारी अभियानÓ राबविण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षापासुन कोरोनामुळे मुलांच्या मनामध्ये जी अमानिक भीती तयार झाली आहे ती दूर करण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षणदेण्यासाठी घाटबोरी जि.प.शाळेत शाळापूर्व तयारी अभियानाची गावात प्रभात फेरी काढण्यात आली होती.यावेळी शाळेच्या मुख्य गेटपासी रंगीबेरंगी रांगोळी काढुन सजावट केली होती,शाळेत आलेल्या मुलांचे आणि पालकांचे गुलाबाचे फुलदेऊन स्वागत करण्यात आले होते तेव्हा गावात प्रभात फेरीत काढुन विद्याथ्र्यांच्या हातात विविध शैक्षणिक घोषवाक्य, सुविचार फलक, बॅनर आकर्षक झळकत होते.यात प्राथमिक शाळेतील विद्याथ्र्यी मोठ्या प्रमाणात उत्सफूर्त सहभागी होऊन.या फेरीत प्रत्येक मूल शाळेत जाईल, एकही मूल घरी राहणार नाही. सहज शिकावे हसत हसत, सहज हसावे शिकत शिकत या फेरीत विविध घोषणा गगणभेदी विद्यार्थी देत होते.गावातील चौका चौकात विद्यार्थी रेझिम खेळत होते.तसेच शिक्षक विविध सर्वधर्मसमभाव यावर शैक्षणिक गिते सादर करत,पालकांना विनंती करत होते की, शिक्षण हे वाघणीचे दूध आहे  ते प्राशन करण्यासाठी मुलांना दररोज शाळेत पाठवा.तर केंद्रप्रमुख, शिक्षक यांनी टाळमुद्रंकाच्या गजरात ठेका धरत होते.गावातील महिला पुरुष मोठ्या आनंदात्मक भावनेने कार्यक्रम पाहत होते.त्यांनतर शाळेत विविध स्टॉल उभारुन, व्यवहारज्ञानाची खरेदी,विक्रीचा, नाणी व नोटाचा, विविध गणिताय कौशल्यांचा अनुभव येण्यासाठी मार्गदर्शन पुस्तिका, शैक्षणिक वस्तु याठिकानी आकर्षक होत्या.नंतर कार्यक्रमाचा समारोह करण्यात आला त्यावेळी गावातील संरपच अध्यक्षस्थानी असताना केंद्रप्रमुख सुभाष देशमुख म्हणाले की,कोविड संसर्गाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झालेला आहे.काही मुले येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होतील, पण प्रत्यक्षात त्यांना अंगणवाडी किंवा बालवाडीचा अनुभवच घेता आलेला नाही. या मुलांची व्यवस्थितपणे शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे, ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील.विद्यार्थी,माता पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून तयारी करुन घेतल्यास कोरोनाच्या काळातील झालेले शैक्षणिक नुकसान भरुन येईल असे केंद्रप्रमुख सुभाष देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला.तर उपस्थित शिक्षक विजय पोटरे आपल्या मनोगत व्यक्त करतानी म्हणाले की,विद्याथ्र्यांना घडविण्यासाठी त्यांना योग्यवेळी आणि योग्य वयात संस्कार करणे गरजेचे आहे. बालवयामध्ये त्यांच्यामध्ये शिक्षणाबाबत अधिक महत्त्व पटवून देत त्यांच्यातील बुद्धिमत्तेला चालना देणे गरजेचे आहे. त्याच उद्देशाने 'शाळापूर्व तयारीÓ अभियानाची गावात राबवण्यात आले आहे.या अभियनातून विशेषत: मूलभूत क्षमता, अध्ययन निष्पत्ती तसेच कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्याथ्र्यांना ओळखून त्या-त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्यामुळे पालकांनी विद्याथ्र्यांना घडविण्यासाठी दररोज शाळेत पाठवा असे म्हणाले.व्यासपिठावर सरपंच श्री चनेवार, शाळासमिती अध्यक्ष शेषराव अंभोरे, पत्रकार संतोष अवसरमोल,केंद्रप्रमुख सुभाष देशमुख, मुख्याध्यापक श्री गाडे,पालक होते.यावेळी शिक्षक विजय होणे यांनी संबोधित केले की,कोरोनामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारी केंद्र बंद  होती.शाळेत दाखल असलेली बालके यांचे प्राथमिक शिक्षण काहीही झालेले नाही.यामुळे यावर्षी शाळेत दाखल होणाऱ्या मुलांची शारीरिक, बौध्दिक,भावनिक विकास,भाषाविकास,गणनपूर्व तयारी करण्यासाठी प्रशिक्षणाची उद्दिष्टे, गरज आणि महत्त्व सांगितले.तसेच कार्यक्रमाचे उत्तमरीत्या आयोजन नियोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थी,पालक, सरपंच श्री चनेवार,शासअ.शेषराव अंभोरे पत्रकार संतोष अवसरमोल,केंद्र प्रमुख सुभाष देशमुख ,मुख्याध्यापक श्री गाडे,

श्रीमती बुटे मॅडम,श्री साबळे, श्रीमती डोंगरे मॅडम,श्री मदन देशमुख,श्री अंभोरे,श्री विजय पोटरे,श्री आखाडे,श्री संदिप पदमने, श्रीमती सुजाता मोरे मॅडम,श्री विजय होणे,अमजद पठाण, अंगणवाडीसेविका, मदतनिस आदि उपस्थित होतोय.


Post a Comment

0 Comments