Ticker

6/recent/ticker-posts

आग लागल्याने पाच घरे जळुन खाक



चिखलदरा तालुका प्रतिनिधी-नितीन वरखडे  

चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह जवळ गावरानी आंब्या हसाठी प्रसिद्ध असलेले माखला गाव आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले हे गाव डोंगर दर्याच्या उंच ठिकाणी असल्याने आगीने बुधवारी रुद्र रूप धारण करून आदिवासी बांधवांच्या पाच घरांना चपेट मध्ये घेतली आहे या आगीने बैठेकर परिवार व मावस्‍कर परिवाराचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे या नागरिकां  चे घर जळाल्या मुळे या नागरीकांवर मोठे संकट कोसळले आहे.

ही आग दिनांक 29/3/22 रोजी माखला गावाला लागल्याचे समजले या आगीत नागरिका चे खाण्या पिण्या चे साहित्य व अन्नधान्य  कपडे जळून राख झाले आहेत.

हे गाव उंच ठिकाणावर असल्याने या गावा कडे जाणारा रस्ता अत्यंत गिट्टी ने उखडलेला खराब असल्या ने येथे कोणती सुविधा तत्काळ शासना कडून तत्काळ पुरविल्या जात नाही या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्याने फोन सुद्धा लागत नसल्याचे समजते .

येथील ग्रामस्थांनी स्वयम् सुचकता दाखवत मोठ्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविले .



त्या मुळे इतर शेजारी घरांना आग लागणया पासून वाचविण्यात यश नागरिकांना आले आहे, प्रशासना कडून मेळघाट मध्ये नागरिकांन साठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन करण्या साठीविविध योजना वापरल्या जात आहेत त्या वर खर्च सुद्धा होत आहे परंतु अनेक गावात नैसर्गिक आपत्ती निर्माण होते त्या वेळी शासकीय कोणती यंत्रणा ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांच्या कामात येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली अतिदुर्गम भागात असलेल्या गावां मध्ये मुख्य रस्ते नसल्याने व मोबाईल नेटवर्क  नसल्याने या भागातील नागरिक अनेक योजने पासून वंचित आहेत माखला येथे लागलेल्या आगीत पाच कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झाले याची माहितीराजकुमार पटेल आमदार मेळघाट यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्या गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली व सातवंन केले प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून या कुटुंबाला नैसर्गिक आपत्तीतून सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याने कुटुंबाने आमदार राजकुमार पटेल यांचे आभार मानले आहेत.

धारणी चिखलदरा तालुक्यात या वेळी मोह फुल वेचण्यासाठी काही नागरिक झाडांच्या खाली पालापाचोळा यांना आग लावत असतात त्या मुळे काही आगीचे प्र माण ही जंगला कडे आग लागण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते अशा वेळी सतर्कता बाळगून जंगलाचे व गावाचे रक्षण करावे असे आवाहन देखील असे ही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments