Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळा ,आश्रम शाळा व वसतिगृहात एका वर्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार का ?विद्यार्थीनी सुरक्षेच्या दृष्टीने आ.सौ .सुलभाताई खोडके यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना


पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आ. सुलभाताई खोडके यांचा आक्रमक पवित्रा

मुंबई - महिला व युवती अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शासनाच्या वतीने नवनवीन कायदे केले जात आहे. तर दुसरी कडे पाशवी अत्याचाराच्या घटना वाढतच असून अल्पवयीन युवती सुद्धा याला बळी पडत आहे. शिक्षणाचे मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळा तसेच वसतिगृह सुद्धा याला अपवाद नसून  तेथील विद्यार्थिनींची सुरक्षा सुद्धा धोक्यात आली आहे. यासर्व प्रकारांना आळा बसावा ,म्हणून राज्यातील सर्व जिल्हापरिषद शाळा , आश्रम शाळा , खासगी शाळा व वसतिगृह आदी ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या मुद्यावर आ .सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्ष वेधले. नुकत्याच  पुणे येथे झालेल्या विद्यार्थिनी लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरून  शुक्रवार २५ मार्च रोजीच्या विधिमंडळ कामकाजा दरम्यान प्रश्न क्रमांक ४२,८०८ वरून आ. सुलभाताई खोडके यांनी राज्यातील सर्व शाळा व वसतिगृहात सीसीटिवी कॅमेरे बसविण्याच्या निर्णयाचे काय झाले असा प्रश्न उपस्थित केला. 

 विद्यार्थिनीच्या लैगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी  वर्ष २०१६ मधील सदरचा निर्णय घेऊन सुद्धा अजून पर्यंत याबबाबत अंमलबजावणी झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात कोणती कार्यवाही झाली , व होत नसल्यास विलंब लागण्याचे कारण स्पष्ट करण्याबाबत मंत्री महोदयांनी खुलासा करावा , असा आक्रमक पवित्रा आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी घेतला . यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील जिल्हा परिषद शाळा  ,आश्रम शाळा, सर्व व्यवस्थापनाच्या खासगी शाळा , तसेच स्थानिक स्वराज्य संस्थानच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. यासाठी डीपीसी , ग्राम विकास विभाग , आमदार निधी सीएसआय मधून अनुदान देण्यात येईल ,राज्यातील जिल्हा परिषदेच्या  ६५ हजार ८६ शाळांपैकी १ हजार २४ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.  तर काही शाळांमध्ये आवश्यकतेनुसार व विद्यार्थी संख्या पाहून ही प्रक्रिया पूर्ण करणार  असल्याचा खुलासा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केला .

यावरून आ.सौ .सुलभाताई खोडके यांनी अधिवेशनात म्हटले ही   ,पुण्यातील शाळेमध्ये जी घटना झाली , अशा  मुलींच्या लैंगिक छळाच्या घटना वारंवार घडत आहे, त्यामुळे काही शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून अन्य शाळांवर अन्याय करू नका ,  त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर  सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत , एक  महिला मंत्री म्हणून  आपण एका वर्षात राज्यातील जिल्हापरिषद  शाळा , आश्रम शाळा व खासगी शाळा , वसतिगृह येथे वर्षभरात  सीसीटीव्ही कॅमेरे लावणार का ? असा सवाल उपस्थित करीत आमदार महोदयांनी शालेय शिक्षण मंत्र्यांना खुलासा मागितला. यावर शालेय शिक्षण शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सभागृहात समक्ष होकार दर्शविला .   

Post a Comment

0 Comments