Ticker

6/recent/ticker-posts

आमदार देवेंद्र भुयार यांच्या दणक्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली ४ कोटी ४ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई !



सिंचन प्रकल्पामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा !


आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप ! 

वरुड तालुका प्रतिनिधी-मौजा दाभी प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत, तसेच शेतजमीनी पेरण्यायोग्य नसल्यामुळे त्या शेतजमिनी संपादीत करून मोबदला देण्याची, व झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी स्वतः दाभी प्रकल्पावर जाऊन संपूर्ण धरण परिसराची व पाझरामुळे नुकसान झलेल्या संपूर्ण शेतीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन करण्यात आली होती त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. 


मौजा दाभी येथील येथील पाझर तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरत असल्याने येथील आजूबाजूला असलेली संपूर्ग शेती बाधित झाली होती. त्यामुळे संत्रा झाडे, कापूस, सोयाबीन, तूर भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरातील शेती नापीक झाल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्यमंत्री बच्चू कडू, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी दाभी प्रकल्पाच्या पाण्यामुळे संत्रा व हंगामी पिकांच्या झालेल्या ३५.७५ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त ४५ शेतकऱ्यांना ४ कोटी ४ लक्ष रुपये मंजूर करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्यमंत्री बच्चू कडू, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुखयांचे आभार मानले. 


   यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मौजा दाभी मुसळखेड येथील ४५ शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, माजी पंचयात समिती सभापती निलेशभाऊ मगर्दे, पाटबंधारे विभागाचे अभियंता सोळंक, दमाये, जैन, गाळे, सागर सालोडे, अश्विन देशमुख, योगेश गुदवारे, मोहनिश लिखितकर, किशोर चंबोळे, किशोर हेलोडे,तसेच नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकरी विकास भाऊ कुबडे, राजुभाऊ तिवस्कर, गेमराज भाऊ कुबडे,दिनेशभाऊ निकम, कृष्णराव घाटोळे,विठ्ठलराव कनाटे तसेच दाभी येथील नुकसानग्रस्त शेतकरी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments