Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस प्रशासन सदा महिलांच्या सेवेसाठी तत्पर : ठाणेदार सनप

 जागतीक महिला दिनी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलां सन्मानित


 
छत्रपती शाहू यंग ब्रिगेड व वर्‍हाड विकास संस्थेचा उपक्रम 


अकोला : खडकी विभागातील संतनगर येथे छत्रपती शाहू यंग ब्रिगेड, वर्‍हाड विकास बहुउद्देशिय संस्था तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कर्तृत्ववान, दैदिप्यमान कार्य करणार्‍या महिलांचा जागतिक महिला दिनी यथोचित सन्मान मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म.अं.नि.स.चे राज्य उपाध्यक्ष महादेवराव भुईभार तर उद्घाटक म्हणून खदान पो.स्टे.चे ठाणेदार श्रीरंग सनप साहेब होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये बबनराव कानकिरड, प्रा. संजय तिडके, नगरसेवक मंगेश काळे, प्रवीण हुंडीवाले, सविता शेळके, विद्या राणे, साहित्यिक पंजाबराव वर, रोशन गायकवाड, चक्रे सर, ओहेकर साहेब होते.   

महिलांनी अबला म्हणून नव्हे तर सबला म्हणून ़खंबिरपणे जगायला शिकले पाहीजे कुठेही महिलांवर अन्याय-अत्याचार सहन केला जाणार नाही पोलीस प्रशासन सदा महिलांच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन ठाणेदार सनप यांनी केले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी ़कर्तृत्ववान महिलांमध्ये संजना बोरकर, दिपाली मनोज देशमुख, ज्योती गायकवाड, कविता डामरे, सविता शेळके, विद्या राणे, दिपा विशाल लांडे, मनिषा भुजाडे, कु. ओवी जवादे, मिनाक्षी शेगोकार, आर्किटेक्ट मंगला आनंद खरे, वृषाली तळेगांवकर, प्रणिता समृतकर, वृषाली डिंकुटवार, कु. सोनाली दिलीप वर, महानंदा गावंडेताई, दिवनाले मॅडम यांचा प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी पत्रकार पंजाबराव वर व त्यांच्या पत्नी सुनंदा वर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोना काळात जिवाची बाजी लावणार्‍यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने लिडरगृपचे आनंद सिरसाट, आकाश हिवराळे, मंगेश लोखंडे, संकेत कांबळे, निलेश मनवर, दुर्गेश मानकर, मनिष गोरे,उत्कर्ष पिंजरकर,  तारण इंगोले एल.सी.बी. पोलीस यांना मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. 

कार्यक्रमाला दिपाली जोशी, पाटील बाई, शोभा डामरे, उषा राऊत, तळेगांवकरताई, ताराबाई गायकवाड, डाबेरावताई, ़कांता घोडे, मनुताई बदरखे, खंडाळकर ताई, साधना डामरे, विशाल  लांडे, कुकडेताई मनोज देशमुख, आकाश सुर्वे,  मनोज गायकवाड, भागवत डामरे, अतूल तळेगांवकर, संजय गायकवाड, महादेवराव महल्ले, ज्ञानदेव डामरे, जवादे साहेब, नाना बोरकर सुभाष भामरे, अनुष्का खरे, उर्मिला सांगळे, सुनिता देशमुख, ज्योती गायकवाड, इंदू पाटील,  काकड ताई, बोर्डेताई, रुपालीताई, शिल्पाताई, माऊलीताई, अलका राठोड, इंद्रायणी मानकर,चव्हाण ताई, साक्षी कांबळे, अर्चना जवादे, साक्षी डामरे, सालफळेताई, श्रीवास्तव ताई, आरुषी तळेगांवकर, गौरी डामरे, इंगळे काकू, द्रोपदी पिंजरकर, रक्षिता मॅडम, डॉ.नेहा सिरसाट,आनंद खरे, स्वप्नील सांगळे,प्रेम गायकवाड,रुद्र जवादे, आराध्या सागळे, गौरी डामरे, श्रीकांत डामरे, वीर गायकवाड, प्रसन्न डामरे, अमित गायकवाड, विहान खरे, साई सांगले, रुद्र जोशी, उत्कर्ष भाऊ पिंजरकर,  यांचेसह बरीच उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन रोशन गायकवाड व पंजाबराव वर यांनी केले. प्रास्ताविक विद्या राणे, संचालन पंजाबराव वर यांनी तर आभार प्रदर्शन गजानन ढाले यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments