Ticker

6/recent/ticker-posts

बुलडाणा महसूलची दमदार कामगिरी

 


बुलडाणा महसूल विभागाला विविध प्रकारात मिळाले बक्षीस

अमरावती विभागीय महसूल क्रिडा व सांकृतिक स्पर्धा

  बुलडाणा,-महसूल विभागाच्या अमरावती विभाग स्तरीय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा बुलडाणा येथे पार पडल्या. ज्यामध्ये अमरावती महसूल विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व  जिल्हयासहीत विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये जिल्हयाने  समुह नृत्य, गायन,  वादन , नाटक, एकल नृत्य, समुह गीत, यांसारख्या विविध कलाप्रकराचे प्रदर्शन ” बुलढाणा THE FIRE रुकेगा नही ” या शिर्षकाखाली केले. ज्यामध्ये जिल्हयातील महसूल अधिकारी व कर्मचारी यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

   निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी आपल्या दमदार आवाजात “खैके पान बनारस वाला” हे गीत सादर केले. या गीताने उपस्थित रसिकांची मने जिंकली. विभागातील उत्कृ‌ष्ट गायक म्हणून दिनेश गीते यांना गौरविण्यात आले. याचबरोबर 

उत्कृष्ट युगल नृत्य प्रकारात शिवराज्याभिषेक, उत्कृष्ट नक्कलमध्ये किशोर जाधव, उत्कृष्ट वादन  सारंग फाळके, उत्कृष्ट रंगभुषा  विजय पाटील (नायब तहसिलदार), उत्कृष्ट युगल गीत गायक  अतुल गवई व अश्विनी जवंजाळ, उत्कृष्ट सांस्कृतीक कला सादरीकरणामध्ये अमरावती विभागात बुलढाणा जिल्हयाने व्दितीय क्रमांक पटकाविला. 

       याचबरोबर अमरावती महसूल विभागाची GENERAL CHAMPIONSHIP जिल्हयाला मिळाली.  क्रिडा स्पर्धेतही क्रिकेट विजेते पदाचा बहुमान जिल्ह्याला मिळाला.   जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांना  लॉन टेनिस, तहसिलदार आश्विनी जाधव बॅडमिंटन, तहसिलदार संजय गरकल लॉन टेनिस, तहसिलदार रुपेश खंडारे बुध्दीबळ, तहसिलदार सैफन नदाफ   क्रिकेट मॅन ऑफ द सिरिज, तहसिलदार शितल सोलाट  ॲथेलेटिक्स क्रीडा प्रकारात  विजेते पद मिळवून दिले.

  या स्पर्धेचे बक्षीस वितरण  26 मार्च 2022 रोजी गर्दे सभागृह येथे  विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते यांचेहस्ते झाले.  सांकृतिक कार्यक्रमाची परिक्षण नाटय दिग्दर्शन जयंत दलाल, तसचे नृत्य निपुण सौ. रोहिणी देशमुख  व गायक अरविंद तळणीकर यांनी केले. 

  या कार्यक्रमास जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती,  अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांचे मार्गदर्शन लाभले.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले. सांकृतिक कार्यक्रमाचे निवेदन शिवानंद वाकदकर यांनी  हेमंत पाटील यांनी आपल्या तडफदार शैलीत केले.   हा कार्यक्रम अमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, महसूल अधिकारी , कर्मचारी, यांचे उपस्थितीत पार पडला.

Post a Comment

0 Comments