Ticker

6/recent/ticker-posts

सोसायटी वॉचमनने केला ११ वर्षीय बालीकेवर अत्याचार, मुंबई हादरलीमुंबई-विशेष प्रतिनिधी-  संपूर्ण राज्य बलात्काराच्या घटणांनी हरलेले असतांनाच आज मुंबईत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोसायटीचा वॉचमन असलेल्या एका नराधमाने ११ वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. त्यामुळे मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी घडलेल्या साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर अगदी काहीच दिवसांत हा प्रकार घडला आहे. 

मुंबईतील कांजुरमार्गमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला काल रात्रीच अटक केली आहे.  पोलिसांनी आयपीसी 354 आणि पोस्को कायद्यांतर्गत त्या नराधम वॉचमनवर गुन्हा दाखल केला आहे. आज त्या नराधम आरोपीला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 

Post a Comment

0 Comments