Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना झाल्यानंतर टक्कल पडण्याची भिती.....?

From Pixabay


मुंबई | कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी धोका मात्र अजूनही कमी झालेला नाही. कोरोनाच्या नव्या प्रकारांमुळे आणि लवकरच येणा-या तिस-या लाटेमुळे आणखी चिंता निर्माण झाली आहे. 


अशातच एक चित्र विचित्र अशी माहिती पुढे आली आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर, योग्य उपचार घेऊन जरी ती व्यक्ती कोरोनामुक्त झाली असली तरी, लाँग कोविड धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते.


परंतू, आता कोरोना झाल्यानंतर टक्कल पडतं का? असा प्रश्न सामान्यांना पडू लागला आहे. कोरोना झाल्यानंतर मधुमेहाचा धोका असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोरोनानंतर काही जण म्युकरमायकोसिस या गंभीर आजाराला देखील बळी पडले होते. 


तर दुसरीकडे कोरोना झाल्यानंतर लठ्ठपणा देखील वाढत असल्याच्या केसेस वाढल्या होत्या. त्यात आता कोरोनाचा आणखी एक नवा दुष्परिणाम समोर आला आहे. कोरोना होऊन गेलेल्या रूग्णांना टक्कल पडत असल्याचे आता समोर आले आहे.


अनेकांच्या कोरोना होऊन गेल्यावर केस गळत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. कोरोना होऊन गेल्यानंतर केस गळण्याच्या आणि टक्कल पडण्याच्या तक्रारी या तुलनेने कमी आहेत. 


परंतु कोरोना काळानंतर अनेकांना जेवण जात नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे, त्यामुळे शरिराला मिळणारे पोषक अन्न कमी पडत असल्याने व्यक्तीच्या शरिरात थकवा, कधीही झोप लागणे, अंगदुखी अशा समस्या उद्भवत आहेत.

Post a Comment

0 Comments