Ticker

6/recent/ticker-posts

या मंदिरात प्रवेश करताच पुरुष बनतो स्त्री, वाचा सविस्तर…




नवरात्रीत भक्त हे देवीला प्रसन्न करण्यासाठी तीच्या नऊ प्रकारांची पूजा करतात. आपल्या देशात कुठल्याही देवाची पूजा ही विधीवत पद्धतीने केली जाते. 


आज आपण जाणून घेणार आहोत, अशा एका अनोख्या मंदिराबद्दल, ज्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. या मंदिरात एक पुरुष स्त्रीचे रूप घेऊन मंदिरात प्रवेश करतो. 


ऐवढच नव्हे तर निघण्यापूर्वी हे पुरुष एखाद्या सुंदर बाईसारखे मेकअप देखील करतात. या गेटअपनंतरच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो. 


हे चमत्कारी मंदिर केरळमधील कोल्लम जिल्ह्यात आहे. ज्याचे नाव कोट्टनकुलागुणरा श्रीदेवी मंदिर आहे. ज्याच्या गर्भगृहात छप्पर किंवा कलश नाही. जिथे लोकांची प्रचंड गर्दी असते. 


लोक 12 महिने येथे नवस फेडतांना दिसून येतात. पण नवरात्रातील दिवसांचे दृश्य हे फार वेगळे असते. येथे प्रतिवर्षी 23 आणि 24 मार्च रोजी चाम्याविलकु उत्सव साजरा केला जातो. जिथे पुरुषाला स्त्रीसारखे कपडे घालावे लागते.


यामागे अशी एक श्रद्धा आहे की, जो कोणी येथे देवीच्या दर्शनासाठी किंवा पूजेसाठी एखाद्या स्त्रीच्या वेषात येईल, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. म्हणून येथील पुरुष स्त्रियांप्रमाणे साड्या परिधान करून, पूर्ण मेकअप करून माँ भाग्यवतीची पूजा करतात.


दरवर्षी दूरून दुरून मोठ्या संख्येने पुरुष भक्त श्री कोत्तानकुलांगरा देवी मंदिरात चमविलक्कुच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी येतात. ज्यांना मंदिरात प्रवेश करण्यासाठी केवळ महिलांचे कपडेच नाही तर त्यांच्याप्रमाणे दागदागिने, गजरा वगैरे देखील घालावे लागतात. 


स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार शेकडो वर्षांपूर्वी या मंदिरात देवीची मूर्ती स्वतः दिसली. जेथे मेंढपाळांनी महिलांचे कपडे परिधान केलेल्या आईच्या मूर्तीची पूजा केली. त्यानंतर येथे येणार्‍या प्रत्येक पुरुषाला या मंदिरात जाण्यासाठी महिलांचे कपडे घालावे लागतात. पुरुषांसह महिला देखील मंंदीरात येऊन दर्शन घेतात.

Post a Comment

0 Comments