Ticker

6/recent/ticker-posts

चंद्राच्या हालचालीमुळे पृथ्वीवर येणार विनाशकारी संकट; नासाच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर



नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून समुद्रात मोठ्या हालचाली होतांना दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रात अनेक चक्रीवादळांनी थैमान घातले आहे. 


जागतिक तापमान वाढीमुळे अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच आता पृथ्वीवर नवे संकट येणार असल्याची धक्कादायक माहिती, नासाच्या अभ्यासातून समोर आली आहे.


हवामान बदलामुळे समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबरोबरच चंद्राच्या कक्षेतील परिवर्तनामुळे (चंद्राच्या हालचालीमुळे) पृथ्वीवर विनाशकारी पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


ही पूरजन्य परिस्थिती 2030 च्या मध्यात अधिक घातक असेल. त्याचबरोबर अमेरिकेच्या किनारपट्टी भागांत समुद्राच्या लाटा आपल्या सामान्य उंचीपेक्षा, तीन ते चार फूट अधिक उंच उसळण्याची शक्यता आहे. 


त्यामुळे तेथील सर्वच देशांच्या किनारपट्टीला धोका असल्याचे नासाच्या अभ्यासातील निष्कर्षातून सांगण्यात आले आहे.


समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे खालच्या भागांवरील संकट सातत्याने वाढत आहे आणि वारंवार पूर येत असल्याने लोकांच्या समस्याही वाढत आहेत. 


हवामान बदल एकत्रितपणे जागतिक स्थरावर किनारपट्टी भागांत पूरजन्य परिस्थिती निर्माण करेल, असे मत नासाचे व्यवस्थापक बिल नेल्सन यांनी व्यक्त केले आहे. 


ही पूरजन्य परिस्थिती संपूर्ण वर्षात नियमित राहणार नसून, काही महिन्यांदरम्यान ही स्थिती राहील. यामुळे याचा धोका आणखी वाढेल, असं या संशोधनातून समोर आले आहे. 


ज्यावेळी चंद्र आपल्या कक्षेतील स्थिती बदलतो, त्यावेळी ते पूर्ण होण्यास 18.6 वर्ष लागतात. मात्र, पृथ्वीवरील वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबरोबर हे अधिक घातक होते, असं हवाई विद्यापिठाचे असिस्टंट प्रोफेसर फिल थॉम्पसन यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments