Ticker

6/recent/ticker-posts

गरिबांची लूट करणाऱ्या रेशन दुकानदारांना नाशिक प्रशासनाचा दणका



नाशिक | कोरोना महामारीच्या संकटामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांकडून गरिबांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. 


अशातच नाशिकमधील स्वस्त धान्य दुकानांवर गेल्या दीड वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे चित्र आहे. 


कोरोना काळात गरिबांची लूट करणाऱ्या तब्बल 26 स्वस्त धान्य दुकान चालकांवर प्रशासनाने कारवाई करत, गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. 


त्यामुळे रेशन दुकानदारांना चांगलाच दणका बसल्याचे दिसून येत आहे. यानुसार नाशिक जिल्हा प्रशासनाने तब्बल 08 हजार दुकानांची तपासणी केली आहे.


याचबरोबर नाशिकमधील जिल्हा प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानदारांकडून तब्बल दीड लाख रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानात धान्य वाटप करत असतांना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर काम केल्याप्रकरणी 09 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 


त्यामुळे स्वस्त धान्य दुकान चालकांवर काही प्रमाणात वचक बसला आहे. बेकायदेशीर काम केल्याप्रकरणी व गरिबांची लूट केल्या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील 44 स्वस्त धान्य दुकानांचे परवाने जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहेत. 


तसेच 51 स्वस्त धान्य दुकानात गैरप्रकार होत असल्याच्या गंभीर बाबी अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments