Ticker

6/recent/ticker-posts

'माझी जन्मभूमी मुंबई सुरक्षित हातात आहे याचा मला आनंद आहे'- लकी अलीमुंबई | सुप्रसिद्ध गायक व संगीतकार लकी अली यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सुपुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे देखील आभाळभर कौतुक केले. 


लकी आली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर स्वतः आदित्य ठाकरे हे लकी अली यांना गाडी पर्यंत सोडायला गेले. याचाच संदर्भ देत लकी अली यांनी म्हटले आहे की, ‘आदित्य ठाकरे हे स्वतः मला गाडी पर्यंत सोडायला आले आणि मला वडिलांप्रमाणे सन्मान दिला.’


मुंबई ही माझी जन्मभूमी आहे आणि माझी जन्मभूमी ही सुरक्षित हातात असल्याचा मला आनंद होत आहे, असे देखील लकी अली यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटलं आहे. 


लकी अली यांनी केलेल्या कौतुकानं तर शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होत असताना पाहायला मिळत आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध गायक लकी आली यांच्या भेटीनंतर त्यांना 'महाराष्ट्र देशा' हे पुस्तक देऊन सन्मानित केले. 


त्यांच्या या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती पुढे आलेली नाही.

Post a Comment

0 Comments