Ticker

6/recent/ticker-posts

सावधान! कोरोना रुग्णांना आता होऊ शकतो बेल्स पाल्सीचा धोका

From Pixabay


मुंबई | युनिव्हर्सिटी हॉस्पिटल क्लीव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एक नवे संशोधन केले आहे. 


या संशोधनात त्यांना कोरोना रुग्णांना बेल्स पाल्सीचा धोका जास्त असल्याचे आढळून आले आहे. 


या आजारात व्यक्तीच्या चेहऱ्याला लकवा मारल्या जाऊ शकतो. त्यामुळे रूग्णाला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो.


कोरोनाने संक्रमित व्यक्तींमध्ये हा धोका सातपटीने वाढू शकतो. कोरोनाच्या एक लाख रुग्णांपैकी 82 जणांना बेल्स पाल्सी हा विकार झाल्याचे संशोधनात निष्पन्न झाले आहे. याबाबत दैनिक भास्कर दिलेल्या वृत्तात याचा उल्लेख आढळतो. 


केल्या गेलेल्या या संशोधनात एकूण 3 लाख 48 हजार कोरोना रुग्णांपैकी 284 रूग्णांना बेल्स पाल्सी झाल्याचे शास्त्रज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे. 


यापैकी 54 टक्के रूग्णांना यापूर्वी कधीच बेल्स पाल्सीचा त्रास झालेला नव्हता. उर्वरित 46 टक्के रूग्णांना पूर्वी बेल्स पाल्सीचा त्रास झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. 


हा त्रास सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांच्या आत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा आजार लवकर बरा होऊ शकतो, असं देखील संशोधकांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments