Ticker

6/recent/ticker-posts

12 ते 18 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाला होणार सुरूवात; नोंदणी सुरू

From Pixabay


मुंबई | कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी नव्या प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर येणारी तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


या पार्श्वभूमीवर शासनाकडून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. आता या मोहिमेत लहान मुलांच्या लसीकरणाला देखील लवकरच सुरूवात होणार असून, लस घेण्यासाठी नोंदणीला सुरूवात झाली आहे. 


याआधी 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला परवानगी दिल्यानंतर, आता लहान मुलांच्या कोरोना लसीलसीकरणाला देखील परवानगी देण्यात आली आहे.


तिस-या लाटेचा धोका कायम असल्याने, लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसीची निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. झायडस कॅडीला या कंपनीला मुंबई महानगरपालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात पत्र दिले होते. कंपनीकडून मुंबई महापालिकेच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.


मुंबईतील नायर रुग्णालयात झायकोडी ही लहान मुलांसाठी विकसित करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लस 50 मुलांना सुरुवातीला देण्यात येणार आहे. 


सोमवारपासून लहान मुलांच्या लसीकरणाच्या नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे व पहिल्याच दिवशी 2 मुलांनी नोंदणी देखील केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments