Ticker

6/recent/ticker-posts

एकाच महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन कोरोना व्हेरिएंट आढळल्याने चिंता वाढली



नवी दिल्ली |  मागील वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे आधीच चिंता व्यक्त केली जात असतांना, एकाच महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन वेगवेगळे व्हेरिएंट आढळल्याने, चांगलीच खळबळ उडाली आहे.


एकीकडे जागतिक पातळीवर कोरोना रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असतांना, घडलेल्या या घटनेने नवी चिंता निर्माण झाली आहे. 


ही घटना बेल्जियममध्ये घडली असून, एका 90 वर्षीय महिलेच्या शरीरात अल्फा आणि बीटा असे दोनप्रकारचे कोरोना विषाणू आढळून आले आहे. 


या महिलेला कोरोना झाल्यानंतर, सुरुवातीच्या काळात या महिलेने घरी राहूनच उपचार घेतले. परंतु उपचार घेऊनही, तब्येतीत सुधारणा होत नसल्याने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


परंतू रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात या महिलेचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. 


तपासादरम्यान डाॅक्टरांना या महिलेच्या शरीरात कोरोनाचे दोन वेगळे व्हेरिएंट आढळून आले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या चिंतेत आणखी भर पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


घडलेला प्रकार हा चिंताजनक असल्याचे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. संबंधित महिलेने सुरुवातीच्या काळात घरीच उपचार घेतले आणि कोरोना प्रतिबंधक लसही घेतलेली नव्हती. 


त्यामुळे धोका वाढल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पण या महिलेच्या शरीरात दोन वेगवेगळे विषाणू नेमके कसे आले, यावर अभ्यास सुरू असल्याचे मत शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments