Ticker

6/recent/ticker-posts

कोरोनामुक्त झाल्यानंतर महिलेला उद्भवली ही नवी समस्या

From Pixabay


नवी दिल्ली | कोरोनाने आधीच अनेक कुटूंब उध्वस्त होऊन, सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे कोरोनाचा धोका हा केवळ फुफ्फुसांवरच नाही तर इतर अवयवांनाही निर्माण झाला आहे. 


कोरोनाचा शरिराच्या इतर अवयवांवर गंभीर परिणाम झाल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे. अशातच कोरोनामुक्त झालेल्या एका 48 वर्षाच्या महिलेच्या पित्ताशयाला सूज आल्याने डॉक्टरही हैराण झाले आहेत.


कोरोना होण्याआधी या महिलेला पित्ताशयासंबंधी कोणताही आजार नव्हता. कोरोना झाल्यानंतर करण्यात आलेल्या उपचारानंतर ती महिला कोरोनामुक्त झाली. मात्र त्यानंतर तिला हा आजार झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


कोरोनामुक्त झाल्यानंतर आरोग्यासंबंधी उद्भवलेली ही पहिली समस्या नाही. याआधी देखील काही रुग्णांना गँगरिन झाल्याचे, दिल्लीच्या मूलचंद मेडसिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले आहे. 


पाटणातील एम्समध्ये कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात अनेक लोक शुगर लेव्हल वाढणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जातांना दिसून येत आहेत.


व्यक्तींना कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस, बोन डेथ आणि आता ग्रीन फंगस झाल्याचे आढळून आले आहे. पुढे अजून कुठल्या आजारांना सामोरे जावे लागणार आहे, हे सांगणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे.

Post a Comment

0 Comments