टीव्हीवरील काही कार्यक्रम असे असतात की ते बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे 'तारक मेहता का उलटा चश्मा'. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केले आहे.
गेल्या 12 वर्षापासून या कार्यक्रमाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन देखील केले आहे. यात काम करणारे सर्व कलाकार आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावतात.
गोकुळ धाम सोसायटीचे एकमेव सचिव आत्माराम भिडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवकर यांच्याबद्दल अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच.
या कार्यक्रमात प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवणारे आत्माराम भिडे हे आपल्या वास्तविक जीवनात कोट्यवधींचे मालक आहेत. मंदारकडे तब्बल २० कोटींची संपत्ती आहे. ते सांगतात की, तारक मेहता या मालिकेच्या एका भागासाठी ते 45,000 रुपये घेतात.
मंदारने याआधी बर्याच अॅवॉर्ड शोमध्ये काम केले असून, त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या आरामदायक गाड्या आहेत. मंदार हे एक अभियंता आहे, परंतु कल्पित स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.
त्याचबरोबर मंदारने अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. परंतु त्याची खरी ओळख आत्माराम भिडे या पात्रामुळे निर्माण झाली आहे.
मंदार यांचा जन्म 27 जुलै 1976 रोजी झाला होता. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते दुबईमध्ये काम करत होते.
0 Comments