Ticker

6/recent/ticker-posts

टाटा ग्रूपची टीसीएस कंपनी देणार इतक्या फ्रेशर्सला नोकरी..आकडा वाचून व्हाल थक्क

From Facebook


मुंबई | टाटा ग्रूपच्या मालकीपैकी एक असलेली टीसीएस कंपनी खासगी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणारी एक मोठी कंपनी आहे. यावर्षीच्या आर्थिक वर्षात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडून तब्बल 40 हजाराहून अधिक फ्रेशर्सना नौकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महाविद्यालयात होणा-या कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोनाचे सावट असतांनाही नवे कर्मचारी दाखल करुन घेण्याच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण झालेली नाही. 


गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेत एकूण 3 लाख 60 हजार फ्रेशर्सने नशीब आजमावले होते. यात कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजाराहून अधिक जणांना नोकरीची संधी देण्यात आली होती.


यावर्षी देखील याच प्रमाणात संधी दिली जाईल, अशी माहिती कंपनीचे ग्लोबल ह्यूमन रिसोर्स चीफ असलेले मिलिंद लक्कड यांनी दिली आहे. 


कंपनीला एखादे प्रोजेक्ट मिळाल्यानंतरच भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असं काही नाही. नोकरी देण्याची एकंदर प्रक्रियाच खूप वेळकाढू असते. एखाद्याला नोकरी देण्यास किमान तीन महिने लागतात, असंही त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments