Ticker

6/recent/ticker-posts

रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम



मुंबई | दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी नुकताच राजकारणाला कायमचा रामराम केला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर रजनी मक्कल मंद्रम हा त्यांचा पक्ष देखील विसर्जित करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामुळे अनेकांची निराशा झाली आहे. 


रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडत, यापुढे एनजीओमार्फत लोकांची सेवा करण्याचा विचार व्यक्त केला आहे.


रजनी मक्कल मंद्रम या त्यांच्या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असं देखील रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे.


त्याचबरोबर आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी रजनीकांत यांनी एक पत्रक जाहीर केलं आहे.


कोविड, निवडणुका, शूटिंग आणि अमेरिकेतील वैद्यकीय तपासणीमुळे मी याआधी कार्यकर्त्यांना भेटू शकलो नव्हतो’, असंही रजनीकांत यांनी फोरमच्या सदस्यांसोबत बैठकीपूर्वी सांगितले आहे.


रजनीकांत यांनी केलेल्या घोषणेमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Post a Comment

0 Comments