Ticker

6/recent/ticker-posts

आता पुण्यात तयार होणार रशियाची कोरोना लस

From Pixabay


पुणे | कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासनाकडून लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. कोरोना विरूद्धच्या लढाईत महत्त्वाची भुमिका निभावण्यात सीरम इन्स्टिट्यूटचा देखील मोठा वाटा आहे. 


अशातच सीरमकडून एक मोठी बातमी समोर येत आहे. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून रशियातील स्पुतनिक-व्ही च्या उत्पादनासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे.


त्यानुसार, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये रशियाची कोरोना लस असलेल्या स्पुतनिक व्ही या लसीचे उत्पादन घेण्याची घोषणा कंपनीने केली आहे. ऑक्सफोर्ड, नोवोवॅक्सच्या कोरोना लसीनंतर आता रशियाची कोरोना लस देखील पुण्यात तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


भारतात एका वर्षामध्ये 300 दशलक्षहून अधिक डोस बनवले जातील. तसेच रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ किरील दिमित्रीव यांनी सांगितलं की, इतर काही निर्माते देखील भारतात या लसीचे उत्पादन करण्यासाठी उत्सुक आहेत.


सर्वात प्रथम रशियाकडून या लसीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून  ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली.

Post a Comment

0 Comments